ETV Bharat / state

शासनाचे आदेश नसताना 'सीसीआय'कडून कापसाच्या दरात ११५ रुपयांची घट; शेतकऱ्यांचा संताप - 'News about CCI Center

जळगाव जिल्ह्यातील सीसीआय कडून कापसाच्या दरात ११५ रुपयांची घट करण्यात आली आहे. यामुळे पूर्वसूचना न देताच कापसाचे दर कमी केल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने सीसीआयच्या केंद्रप्रमुखांना नोटीस बजावली आहे.

absence of a government order, CCI has reduced the price of cotton by Rs 115
शासनाचे आदेश नसताना 'सीसीआय'कडून कापसाच्या दरात ११५ रुपयांची घट; शेतकऱ्यांचा संताप
author img

By

Published : Dec 22, 2020, 4:40 PM IST

जळगाव - एकीकडे कोरोना, अतिवृष्टी व अवकाळी अशा संकटांना शेतकरी तोंड देत आहेत. दुसरीकडे शेती मालाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. अशा परिस्थितीत आता 'सीसीआय'ने कोणतीही पूर्वकल्पना न देता कापसाच्या दरात ११५ रुपयांची घट केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सीसीआय प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पूर्वसूचना न देताच कापसाचे दर कमी केल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने सीसीआयच्या केंद्रप्रमुखांना नोटीस बजावली आहे.

गेल्या काही वर्षांपासून शासकीय खरेदी केंद्रावर वाढत जाणारा व्यापाऱ्यांचा प्रभाव, सीसीआयच्या अधिकाऱ्यांची व्यापाऱ्यांसोबत असलेली मिलीभगत यामुळे व्यापाऱ्यांप्रमाणेच आता सीसीआयच्या केंद्रावर देखील शेतकऱ्यांची लुट सुरु झाली आहे. शासनाने कापसाला ५ हजार ७२५ इतका हमीभाव निश्चित केला असतानाही सुरुवातीलाच सीसीआयने ओलाव्याचे कारण देत शेतकऱ्यांचा माल हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी केला. त्यानंतर आता शेतकऱ्यांचा चांगला माल विक्रीसाठी येवू लागल्यानंतर आता कापसाची प्रत खालावली आहे, असे कारण देत सीसीआयने हमीभावात ११५ रुपयांची घट केली आहे. आर्द्रतेचे कारण देत सीसीआयच्या केंद्रावर कापसावर कट्टी लावण्याचे धोरण देखील सीसीआयच्या अधिकाऱ्यांनी अवलंबले आहे. यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांची लुट सुरु असल्याने शेतकऱ्यांकडून सीसीआयच्या मनमानी निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या विषयाबाबत सीसीआयच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.

शेतकऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा -

जळगाव तालुक्यातील काही शेतकरी मंगळवारी आपला माल घेवून आव्हाणे येथील सीसीआयच्या केंद्रावर आले. त्याठिकाणी सीसीआयने भावात केलेल्या घटमुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. ग्रेड लावून कट्टी लावल्यास सीसीआय विरोधात आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. आधीच कट्टी लावून हमीभावात २०० ते ३०० रुपये कमी दराने मालाची खरेदी केली जात असताना, आता अचानकपणे भावात घट करून, हमीभावापेक्षा पाचशे रुपये कमी दरात माल खरेदी करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. सीसीआयने शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देताच दर कमी केले, असा आरोप आव्हाणे येथील प्रगतीशिल शेतकरी भगवान श्रीधर चौधरी यांनी केला.

शेतकऱ्यांची फिरवा-फिरव-

जळगाव तालुक्यात जळगाव शहरासह आव्हाणे येथील तीन जिनिंगमध्ये सीसीआयकडून माल खरेदी केला जात आहे. मात्र, एक दिवस एका जिनिंगमध्ये तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या जिनिंगमध्ये माल घेतला जातो. अशाप्रकारे रोटेशन सिस्टिमने मालाची खरेदी केली जात आहे. मात्र, सीसीआयकडून हे निर्णय ऐनवेळी बदलले जात असल्याने शेतकऱ्यांना माल घेवून एका जिनिंगकडून दुसऱ्या जिनिंगमध्ये माल घेवून फिरावे लागत आहे. अनेक शेतकरी तीन दिवसांपासून मालाने भरून आणलेल्या ट्रकसह रांगेत उभे राहत आहेत.

व्यापाऱ्यांना प्राधान्य, शेतकरी रांगेत -

सीसीआयच्या केंद्रावर देखील व्यापाऱ्यांचे काही दलाल सक्रिय झाले असून, व्यापाऱ्यांचा मालाला टोकन देवून त्यांचा क्रमांक पुढे लावला जात आहे. यामुळे सीसीआयच्या केंद्रावर मंगळवारी काही प्रमाणात गोंधळ देखील झाला. शेतकरी प्रामाणिकपणे रांगेत उभा राहून आपला माल विक्रीसाठी आणत असताना जिनिंगमध्ये त्याच्याआधी व्यापाऱ्यांचा माल खरेदी केला जात असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करु नका -

सीसीआयने शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देताच भावात ११५ रुपये कमी केल्याने बाजार समिती प्रशासनाने सीसीआयच्या केंद्रप्रमुखांना नोटीस बजावली आहे. हमीभावात घट केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान केले जात आहे. त्यामुळे याबाबत त्वरित निर्णय घेवून, खुलासा सादर करण्याचा सूचना बाजार समितीने सीसीआय प्रशासनाला दिल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.