ETV Bharat / state

हिंगोलीमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 228 वर ; 3 नवीन कोरोना रुग्णांची भर - हिंगोली कोरोना लेटेस्ट न्यूज

सेनगाव तालुक्यात भगवती येथील 3 व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 228 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यातील 186 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर सध्या एकूण 42 कोरोनाबाधित रुग्णांवर तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत.

हिंगोली
हिंगोली
author img

By

Published : Jun 15, 2020, 1:20 PM IST

हिंगोली - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. सेनगाव तालुक्यात भगवती येथील 3 व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 228 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यातील 186 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर सध्या एकूण 42 कोरोनाबाधित रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात कोरोनाला हरवण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. केवळ प्रशासनाच्या सतर्कतेमुळेच कोरोना रुग्ण आढळलेला भाग काही वेळातच सील केला जात आहे. त्यामुळे संबंधित भागातील नागरिक खबरदारी घेत आहेत. नव्याने आढळलेले तिन्ही रुग्ण हे मुंबई येथून आपल्या गावी परतले होते. तसेच वसमत येथील कुरेशी मोहल्ला आणि अशोक नगरमध्ये आढळलेल्या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना कोणत्याही प्रकारचे लक्षणे नसल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे.

कळमनुरी तालुक्यातील जाम डोंगरकडा येथील कोरोनाबाधित रुग्णावर कळमनुरी कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. तर राज्य राखीव दलाच्या जवानाला कळमनुरी येथील डेडीकेटेड हेल्थ सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, विशेष काळजी म्हणून औरंगाबाद येथील धूत हॉस्पिटलमध्ये जवानाला हलवण्यात आले आहे.

सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये एकूण 31 कोरोनाबाधित रुग्णावर उपचार सुरू आहेत. यामध्ये चोंढी खु 5, सेनगाव 3, रिसाला बाजार 2, नगर परिषद कॉलनी 4, कलगाव 6, सिरसम बु 1, ब्राह्मणवाडा 1, सुकळी वळण 1, खानापूर 1, पेन्शनपुरा 4, भोईपुरा 1, कमला नगर 1, वसमत येथील सम्राट नगर 1, आशा 31 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोना केअर सेंटरमध्ये 2 हजार 847 व्यक्तींना दाखल केले असता, त्यातील 2 हजार 307 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले असल्याने, त्यांना सुट्टी दिलेली आहे. तर 514 जण दाखल असून, 110 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.