ETV Bharat / state

Obscene To The Student : सहा विद्यार्थिनिसोबत अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकास ग्रामस्थांनी बदडले - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या (Zilla Parishad Primary School) मुख्याध्यापकाने शाळेतील एक दोन नव्हे तर सहा विद्यार्थिनी सोबत अश्लील चाळे ( obscene to the student ) केल्याने संतप्त ग्रामस्थांनी मुख्याध्यापकास चांगलेच झोडपले (headmaster was beaten by the villagers). गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थिनी भीतीपोटी हा धक्कादायक प्रकार सहन करीत होत्या, त्रास असह्य झाल्याने त्यांनी नातेवाईकांना ही बाब सांगीतली तेव्हा हा प्रकार समोर आला.

Accused Headmaster
चाळे करणारा मुख्याध्यापक
author img

By

Published : Jun 12, 2022, 5:32 PM IST

हिंगोली: तोंडापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत (Zilla Parishad Primary School) कार्यरत असलेला मुख्याध्यापक हा काही दिवसापासून विद्यार्थिनिसोबत अश्लील चाळे ( obscene to the student ) करायचा त्याने संगणक असलेल्या खोलीला बाहेरून काही दिसू नये म्हणून पोतेही लावल्याचे समोर आले आहे. मुख्याध्यापकाचा त्रास विद्यार्थिनी भीतीपोटी सहन करत होत्या एवढेच नव्हे तर हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील तो विद्यार्थ्यीनींना देत होता त्यामुळे या विद्यार्थिनी घाबरून गेल्या होत्या, मात्र या मुख्याध्यापकाचा त्रास सहन न झाल्याने विद्यार्थिनींनी नातेवाईकांना सगळा प्रकार सांगितला त्यावरुन नातेवाईक हे या शिक्षकावर अति बारकाईने लक्ष ठेवून होते.

मुख्याध्यापक शाळेत दाखल होतात विद्यार्थिनींच्या नातेवाईकांनी शाळेत धाव घेऊन त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र तो नातेवाईकांसोबत अरेरावीची भाषा करत होता त्यामुळे नातेवाइकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी मुख्याध्यापकास ताब्यात घेत चांगलेच बदडून काढले. नातेवाईक एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी चोप दिल्यानंतर पोलिसांना देखील हा प्रकार सांगतात पोलीस दाखल होताच मुख्याध्यापकास पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी बाळापुर पोलीस ठाण्यात मुख्याध्यापका विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकाराने हिंगोली जिल्ह्यांत एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा sexually Assaulting A Minor : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.