ETV Bharat / state

पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा एटीएम फोडण्याचा डाव फसला

चोरट्याने डोंगरकडा येथे भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. एटीएम खोलीची भिंत पूर्ण फोडली. मात्र ही बाब आखाडा बाळापूर पोलिसांना कळाली. पोलिसांनी देखील घटनेचे गांभीर्य ओळखले अन् घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे चोरट्याने घटनास्थळावरून पलायन केले. पोलीस वेळीच दाखल झाल्याने चोरट्यांचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला.

http://10.10.50.85//maharashtra/17-June-2021/mh-hin-01-atm-atack-mh10041_17062021194341_1706f_1623939221_394.jpg
पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा एटीएम फोडण्याचा डाव फसला
author img

By

Published : Jun 17, 2021, 9:21 PM IST

हिंगोली - जिल्ह्यात काही केल्या धाडसी चोऱ्याचे प्रमाण हे अजिबात कमी होत नाहीये. संधी साधून चोरट्याने डोंगरकडा येथे भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. एटीएम खोलीची भिंत पूर्ण फोडली. मात्र ही बाब आखाडा बाळापूर पोलिसांना कळाली पोलिसांनी देखील घटनेचे गांभीर्य ओळखले अन् घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे चोरट्याने घटनास्थळावरून पलायन केले. पोलीस वेळीच दाखल झाल्याने चोरट्यांचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला. एटीएममध्ये दहा लाख रुपयांची रोकड होती.

हिंगोली जिल्ह्यातील नांदेड ते हिंगोली या राष्ट्रीय महामार्गावरील डोंगरकडा येथे रस्त्यावरच भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे. अन् शाखेलाच लागून एटीएम मशीन आहे. अगदी रस्त्याच्या कडेलाच असलेल्या या एटीएमचा रस्त्यावरून ये-जा करणार्‍या नागरिकांना तसेच प्रवाशांना सर्वाधिक मोठा फायदा होतो. वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या बँकेचा गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने मागील दरवाजा तोडला अन् आत प्रवेश करत सीसीटीव्ही कॅमेरे फोडून टाकले. नंतर कपाट सरकवून एटीएमच्या मागील बाजूची भिंत फोडली व कटरच्या साह्याने एटीएमचा पत्रा कापण्याचा प्रयत्न केला. ही बाब काही जणांच्या लक्षात आली. त्यामुळे लागलीच काही जणांनी बाळापूर पोलिसांना कळविली.

घटनेचे गांभीर्य ओळखून ताबडतोब घेतली पोलिसांनी धाव
सदरील घटनेसंदर्भात पहाटे चारच्या सुमारास माहिती बाळापूर पोलिसांना मिळाली, तोच बाळापूर पोलीस ठाण्याचे सपोनि रविकांत हुंडेकर, जमादार भगवान वडकिले, प्रभाकर भोंग या पथकाने घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. मात्र पोलिसांच्या वाहनांमुळे चोरटे घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकाराने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

रक्कम सुरक्षित असल्याची माहिती
एटीएम फोडल्याची माहिती संपूर्ण जिल्ह्यात पसरली असता, एटीएममध्ये दहा लाख रुपयांची रक्कम होती. या प्रकरणी कारवाई सुरू असून, प्राथमिक माहितीनुसार एटीएम मधील रक्कम गेली नसल्याची माहिती बँक व्यवस्थापक किरण सुर्वे यांनी दिली. तर आखाडा बाळापूर पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.