हिंगोली : लहान मुले खेळताना तोंडात कधी काय घालतील याचा नेम नाही. हिंगोलीत अशीच एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. येथे ४ वर्षीय बालकाच्या अन्ननलीकेत धातुची हनुमानाची मुर्ती मिळाली आहे. या मुलाचे वय चार वर्ष असे आहे. या मुलावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. ही घटना घडल्यानंतर कुटुंब पैशांची मदत आवश्यक असल्याने सराफाकडे गेले होते. यावेळी तेथील सराफ यांनी उपचारासाठी नांदेडला डॉ. नितीन जोशी यांच्या गॅलक्सी पचनसंस्था या हॉस्पिटलमध्ये जा असा सल्ला दिला. तसेच, शिवाय बाळाच्या पोटातून हनुमानजीची मूर्ती बाहेर काढली जाईल, असा विश्वासही दिला. त्या बाळाच्या पालकांनी कोणताही विलंब न करता पोट विकार तज्ज्ञ डॉ. नितीन जोशी यांचे रुग्णालय गाठले. त्यानंतर डॉ. जोशी यांनी शर्तीचे प्रयत्न करत मुर्ती बाहेर काढली त्यानंतर कुटुंबाची आणि त्या मुलाची सुटका झाली.
बालकाला असह्य वेदना झाल्या : दुपारच्या सुमारास त्या बालकाने ही मुर्ती गिळली होती. त्यानंतर त्याच्यावर सायंकाळी उपचार केले. त्या काळात बालकाला असह्य वेदना सुरू झाल्या. त्याला श्वास घ्यायलाही मोठा त्रास सहन करावा लागला. दरम्यान, हे पाहून पालकांची चिंताही वाढतच होती. यावेळी डॉ. नितीन जोशी यांनी अवघ्या काही मिनिटांमध्ये त्यावर उपचार करून बाळाला एकप्रकारे जीवनदान दिले.
मूर्ती अन्ननलिकेतून बाहेर काढण्यात आली : अन्ननलिकेत एक मूर्ती अडकल्यामुळे बालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची तपासणी केल्यानंतर त्याच्या अन्ननलिकेत एक मूर्ती अडकलेली होती. दरम्यान, आजच्या काळात प्रत्येक पालकाने आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे असा संदेश डॉ. नितीन जोशी यांनी दिला आहे. तसेच, कोणतीही वस्तू आपल्या बालकाच्या हातात देण्यापूर्वी अथवा त्याच्या गळ्यात बांधण्यापूर्वी त्या वस्तुमुळे त्याचे आरोग्य आणि प्राण धोक्यात येणार नाही ना याचीही काळजी घ्यावी असही ते म्हणाले आहेत.