हिंगोली- कधी आक्रमक भाषणाने तर कधी ढसा ढसा रडल्याने सर्वांचे लक्ष बनलेले कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर ( Santosh Bangar in Shinde group ) हे शिंदे गटात सामील झाल्याने माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांनी बांगर यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी ( district chief of Hingoli ) केली आहे. संतोष बांगर हे त्यांच्या भाषणाने नेहमीच चर्चेचा विषय ठरत आले आहेत. मध्यंतरी बंडखोर अंदारांना रडून रडून पुन्हा पक्षात येण्यासाठी विनंती करत असल्याचा त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. बांगर शिंदे गटात सहभागी झाल्याने त्यांच्यावर ही कडक कारवाई करण्यात आली आहे.
कोण आहेत आमदार संतोष बांगर- १२ वर्षांपासून हिंगोली जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली असताना ( Santosh Bangar work in Hingoli ) त्यांनी या कालावधीत प्रचंड कामे केली आहेत. तसेच २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेनाकडून उमेदवारी मिळवून काँग्रेसचे विद्यमान आमदार व तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री शिवाजी मोघे ( ex Minister Shivaji Moghe ) यांचे जावई संतोष टारफे यांचा पराभव करून विधानसभेवर निवडून गेले आहेत.
बांगर यांनी शिवसेनेचे तयार केले वर्चस्व- हिंगोली जिल्ह्यात तिन्ही नगर पालिका, जिल्हा परिषद पंचायत समितीसह दोन्ही नगर पंचायतमध्ये शिवसेनेचे वर्चस्व बांगर यांनी मिळून दिले होते. एवढेच नव्हे तर गोरगरिबांच्या अडीअडचणी सोडण्यासाठी धावून जाणारे संतोष बांगर यांची ओळख आहे. कोणत्याही कार्यकर्त्यांचा फोन आल्यानंतर त्याची अडचण सोडवण्यासाठी प्रयत्न करत असत.
कडवट शिवसैनिक म्हणून ओळख - आमदार संतोष बांगर यांच्यावर ठाकरे घराण्याचा फार विश्वास होता. उद्धव ठाकरे थेट संतोष बांगर यांच्या सोबत संपर्क साधून, जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेत असत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मराठवाड्यातील अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून बांगर यांची ओळख आहे.
नारायण राणे यांना दिली होती धमकी- नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानशिलात लागण्याची भाषा केल्यानंतर आमदार संतोष बांगर यांनी उद्धव ठाकरे यांचे आदेश आले होते. कोकणात जाऊन नारायण राणे यांचा कोथळा बाहेर काढू, अशी आमदार बांगर यांनी धमकी दिली होती. एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारले. तेव्हा आमदार बांगर यांनी टीका करताना बंडखोर आमदारांच्या बायका त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. त्यांच्या मुलांना बायका मिळणार नाहीत अशी टीका केली होती.
आमदार संतोष बांगर गहीवरले - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणामुळे हिंगोली कळमनुरीचे आमदार संतोष बांगर गहीवरले होते. त्यांच्या डोळ्याच अश्रू पहायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ( CM Eknath Shinde ) सभागृहात अतिशय सूंदर भाषण केले असे संतोष बांगर म्हणाले. बाळासाहेबांचा शिवसैनिक कसा असावा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले असे आमदार संतोष बांगर म्हणाले. त्यांनी विधानभवनातून बहुमत चाचणीनंतर धावता पाय काढला.
हेही वाचा-आमदार असावा तर असा.. जनतेच्या सेवेसाठी मोडली स्वतःची 90 लाखांची एफडी
हेही वाचा-Santosh Bangar On Eknath Shinde: एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याचा फार आनंद - संतोष बांगर
हेही वाचा-आमदार संतोष बांगर शिंदे गटात; शेवटच्या श्वासापर्यंत ठाकरेंसोबत म्हणत झाले होते अश्रू अनावर