ETV Bharat / state

हिंगोलीमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; 6 लाखाचा मुद्देमाल जप्त

सध्या गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र, तरीही गणेश मंडळ परिसरात जुगार खेळणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड
author img

By

Published : Sep 8, 2019, 8:20 PM IST

हिंगोली- शहरातील लाला लजपतराय नगरमध्ये एका घरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. यामध्ये पोलिसांनी 6 लाख 47 हजार 230 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यामधील आरोपींमध्ये प्रतिष्ठितांचा समावेश आहे.

हेही वाचा - परभणीत हायप्रोफाईल जुगार अड्यावर छापा; साडेआठ लाख रुपयांच्या मुद्देमालासह 20 जुगारी अटकेत

ओम वाघमारे, नामदेव वाघमारे, पांडुरंग राठोड, दत्तराव उघडे, हरिष साहू, रतन डोम्पे, आयुब प्यारेवाले आणि इतर हे या ठिकाणी जुगार खेळताना आढळून आले. यामधील आयुब प्यारेवाले याने पलायन केले. गुन्हे शाखेने मारलेल्या छाप्यामुळे कॉलनीत एकच खळबळ उडाली होती. यावेळी आरोपींकडून 9 हजार 30 रुपये रोख, 78 हजार 200 रुपये किंमतीचे 6 मोबाईल, 5 लाख रुपये किमंतीची 1 कार, 60 हजार रुपये किमंतीची 1 दुचाकी असा 6 लाख 47 हजार 230 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हेही वाचा - विरारमध्ये जुगार अड्डयावर छापा; १३ जणांना अटक, १० महिलांचाही समावेश

ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, जगदीश भांडारवर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

गणेशोत्सवातही जुगार जोरात -

सध्या गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र, तरीही गणेश मंडळ परिसरात जुगार खेळणाऱ्यांची संख्या जास्त आहे. शनिवारी वसई येथे गणरायच्या मूर्ती परिसरात जुगार खेळताना काही जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

बालाजी शेषराव कदम, जनार्दन बापुराव सावळे, विजय ज्ञानदेव सावळे, शिवाजी केशवराव कदम, राजू कुंडलिकराव सावळे, संतोष देविदास सावळे, ज्ञानेश्वर अशोकराव शिंदे, गुलाब निवृत्ती सावळे, नवनाथ चंद्रप्रकाश कदम अशी आरोपीची नावे आहेत. आरोपींकडून 3 हजार 650 रोख, तर 26 हजार रुपयांचे 7 मोबाईल, असा एकूण 29 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

Intro:
हिंगोली- शहरातील लालाजपतराय नगरात एका घरात सूरु असलेल्या झन्ना मन्नावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून 6 लाख 47 हजार 230 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपी विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Body:
ओम वाघमारे, नामदेव वाघमारे, पांडुरंग राठोड, दत्तराव उघडे, हरिष साहू, रतन डोम्पे, आयुब प्यारेवाले, इतर हे सर्व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारला असताना जुगार खेळताना आढळून आले. ललालजपराय की कॉलनी अतिशय प्रतिष्ठित कॉलनी म्हणून हिंगोली शहरात ओळख आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी सर्व प्रतिष्ठित नागरिक वास्तव्यास आहेत. मात्र आज मारलेल्या छाप्यामुळे कॉलनीत एकच खळबळ उडाली आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून, आरोपिकडून 9 हजार 30 रुपये नगदी, 78 हजार 200 रुपये किंमतीचे 6 मोबाईल, 5 लाख रुपये किमंतीची एक कार, 60 हजार रुपये किमंतीची एक दुचाकी असा 6 लाख 47 हजार 230 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील आयुब प्यारेवाले याने पलायन केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार,अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोनि जगदीश भांडारवर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. आरोपी मध्ये प्रतिष्ठितांचा समावेश आहे.

Conclusion:गणेशोत्सवात ही मोठया झन्ना मन्ना जोरात

सध्या गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र काही केल्या गणेश मंडळ परिसरात जुगार खेळणाऱ्याची संख्या कमी झालेली नाही. शनिवारी वसई येथे गणरायच्या मूर्ती परिसरात जुगार खेळताना आढळून आले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
बालाजी शेषराव कदम जनार्दन बापुराव सावळे, विजय ज्ञानदेव सावळे, शिवाजी केशवराव कदम, राजू कुंडलिकराव सावळे, संतोष देविदास सावळे, ज्ञानेश्वर अशोकराव शिंदे, गुलाब निवृत्ती सावळे, नवनाथ चंद्रप्रकाश कदम अशी आरोपीची नावे आहेत. आरोपिकडून नगदी 3 हजार 650, तर 26 हजार रुपयांचे 7 मोबाईल
असा एकूण 29 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.