ETV Bharat / state

दारूच्या नशेत वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; हिंगोलीत तिघे ताब्यात

खटकाळी रेल्वे गेटवर कर्तव्य पार पाडत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला मद्यपी दुचाकीस्वराने जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. बुधवारी (26 फेब्रुवारी) सायंकाळी 5.45 सुमारास संबंधित घटना घडली.

police officer beaten by drunken man
खटकाळी रेल्वे गेटवर कर्तव्य पार पाडत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला मद्यपी दुचाकीस्वराने जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
author img

By

Published : Feb 27, 2020, 6:06 PM IST

हिंगोली - शहरातील खटकाळी रेल्वे गेटवर कर्तव्य पार पाडत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला मद्यपी दुचाकीस्वराने जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. बुधवारी (26 फेब्रुवारी) सायंकाळी 5.45 सुमारास संबंधित घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी गजानन सांगळे यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

नितीन किसनराव कवडे, राधेश्याम विठ्ठल हरण, कमळाजी प्रल्हादराव हरण अशी आरोपींची नावे आहेत. हे आरोपी निष्काळजीपणे दुचाकी चालवत असल्याने पोलीस कर्मचारी सांगळे यांनी त्यांना थांबवले. तसेच दुचाकीच्या कागदपत्रांबाबत विचारपूस केली.

मात्र, आरोपी दारूच्या नशेत असल्याने त्याने गैरवर्तन केले. त्याची ब्रेथ अॅनालायझर मध्ये तपासणी केल्यानंतर यामध्ये 82.00 एम. जी अल्कोहोल सापडले. संबंधित प्रक्रिया करत असताना या दारूड्यांनी दमदाटी करून पोलिसाची कॉलर पकडली. तसेच खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये सांगळे मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत.

सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून या प्रकाराने पोलीस प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. यासंदर्भात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी व विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.