हिंगोली - गोरेगावमधील एका युवकाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. राहुल सोळंके (वय २८), असे मृताचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
राहुल हा हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथील रहिवासी असून त्याचे गोरेगावात चष्म्याचे दुकान आहे. तो हिंगोली येथे आपल्या मित्राला भेटण्यासाठी आला होता. त्यानंतर त्याने आपल्या मित्राला फोन करून तेथे येण्यास सांगितले. परंतु, मित्र तेथे येण्याअगोदरच त्याने अकोला मार्गे जाणाऱ्या रेल्वेसमोर उडी घेत जीवन संपवले. यात राहुलचे डोके धडापासून वेगळे झाले.
यावेळी घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी जमली होती. राहुलकडे असलेल्या मोबाईलवर त्याच्या घरून सारखे फोन येत होते. राहुलच्या मित्राने घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर आरपीएफ जवानाने मृतदेह पंचनाम्यासाठी रेल्वे स्थानकात आणला. दरम्यान, राहुलने आत्महत्या कोणत्या कारणाने हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, या घटनेने एकच खळबळ उडाली.