हिंगोली- आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा मराठवाड्यात उष्णतेची लाट पसरली आहे. वाढत्या तापमानाने जीव लाही-लाही होत आहे. अशाच परिस्थितीत एकाचा हिंगोलीत उष्मघाताने मृत्यू झाल्याची घटना दुपारी १ च्या सुमारास घडली आहे.
हिंगोली जिल्ह्यात दोन ते तीन दिवसांपासून उन्हाचा पारा एवढा वाढला आहे की, दहाच्या सुमारासच उन्हाचे चटके लागण्यास सुरुवात होत आहे. दुपारच्या वेळी तर उन्हाच्या झळा असह्य होत आहेत. अशा परिस्थितीत हिंगोली शहरातील वर्दळीच्या ठिकाणी गांधी चौक येथे एका व्यक्तीला चक्कर आली अन् तो जागेवर कोसळला. यात त्याचा मृत्यू झाला आहे.
सदरील व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. मृतदेह जिल्हासामान्य रुग्णालयात हलविला आहे .शहर पोलीस मृताची ओळख पटवण्याचा प्रयत्न करीत आहे.