ETV Bharat / state

#CAA विरोध : सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हिंगोलीत युवकांनी स्वतःलाच केले 'जेरबंद' - गांधी चौक

सरकारचे आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हिंगोलीतील मुस्लीम युवक वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहेत. बुधवारी काही तरूणांनी हातात 'हातकड्या' घालून स्वतःला बंदिस्त करून घेत, सरकारही CAA आणि NRC चा वापर करून असाच अन्याय करत असल्याचा आरोप मुस्लीम बांधवांनी केला.

Muslim youth protest against CAA in hingoli
सीएएविरोधात हिंगोलीत आंदोलन
author img

By

Published : Jan 23, 2020, 10:01 AM IST

हिंगोली - संपूर्ण भारतात ठिकठिकाणी सीएए व एनआरसी विरोधात मुस्लीम बांधव आक्रमक झाले आहेत. वेगवेगळ्या संघटनांच्यावतीने उपोषण, आंदोलन करत या कायद्याला विरोध दर्शवला जातो आहे. याच धर्तीवर हिंगोलीतील गांधी चौक येथे 13 जानेवारी पासून मुस्लीम बांधवांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.

हेही वाचा... माझ्याकडे जन्माचा दाखला नाही, ..म्हणजे मी भारतीय नाही का?

सरकारचे आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मुस्लीम युवक वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहेत. बुधवारी काही तरूणांनी हातात 'हातकड्या' घालून स्वतःला बंदिस्त करून घेत सरकारही असाच अन्याय करत असल्याचा आरोप मुस्लीम बांधवांनी केला.

हेही वाचा... डोळ्यापुढे धूर.. गुदमरणारा श्वास..अन् आक्रोश.. 'झेन'ने सांगितला आगीचा थरार

हिंगोलीतील गांधी चौक येथे एनआरसी आणि सीएएच्या विरोधात मुस्लीम बांधवांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलना दरम्यान मुस्लीम बांधवांकडून रोज आगळ्या वेगळ्या पद्धतीने निदर्शने करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला जातोय. मंगळवारी काही मुस्लीम युवकांनी अंगावर तिरंगा काढत त्यामध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणारे शब्द लिहिले. तर बुधवारी स्वतःला बंदिस्त करून घेत, सरकार देखील मुस्लिम बांधवांना असेच नजरकैदेत ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. गुरूवारी या आंदोलनाचा शेवट दिवस आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेची बैठक घेण्यात येणार आहे. त्यामध्ये पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असे आंदोलकांनी सांगितले.

Intro:

हिंगोली- संपुर्ण भारतात सीएए व एनआरसी विरोधात मुस्लिम बांधव आक्रमक झाले आहेत. वेगवेगळ्या संघटनेच्या वतीने साखळी उपोषण करीत या कायद्याला विरोध दर्शविला जातोय. त्याच धर्तीवर हिंगोली येथील गांधी चौक येथे 13 जानेवारी पासून मुस्लिम बांधवांनी धरणे सुरू केले आहे. मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी मुस्लिम युवक वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करीत आहेत. तर आज हातात हातकडी घालून स्वतःला बंदीस्त करून घेत सरकार ही असाच अन्याय करत असल्याचा आरोप मुस्लिम बांधवांच्या वतीने केलाय.

Body:हिंगोली येथील गांधी चौक येथे जानेवारीपासून एन आर सी अन सीएए च्या या विरोधात मुस्लिम बांधव बेमुदत धरणे आंदोलनास बसले आहेत. या आंदोलनादरम्यान मुस्लिम बांधवांच्या वतीने रोजच आगळेवेगळे निदर्शने करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केलाय याठिकाणी मंगळवारी काही मुस्लीम युवकांनी अंगावर तिरंगा काढतात त्यामध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणारे शब्द लिहिले तर आज स्वतःला बंदिस्त ठेवुन, सरकार ही असेच मुस्लिम बांधवांना नजरकैदेत ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. वेगवेगळ्या आक्रमक भूमिका घेऊन देखील प्रशासनाने अजिबात या आंदोलनाकडे लक्ष दिले नसते नाही. Conclusion:केवळ एका ठराविक समाजाचे आंदोलन असल्यानेच प्रशासन ही या आंदोलनाकडे लक्ष देण्यासाठी दुजाभाव करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. आज या आंदोनाचा शेवट असून, आज संघटनेची बैठक घेण्यात येणार आहे त्यामध्ये पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाईल असे आंदोलकांनी सांगितले. तसेच जोपर्यंत नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द होत नाही तोपर्यंत असे आंदोन सुरूच राहणार असल्याचेही आंदोलकांनी सांगितलेय.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.