हिंगोली - उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणाचा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने निषेध नोंदवण्यात आला. तसेच हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात यावे, अशी मागणीही वंचिततर्फे करण्यात आली. याप्रकरणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवदेनही दिले.
येथील एका युवतीवर केलेल्या सामूहिक बलात्कार करण्यात , युवतीच्या शरीराचे एक एक पार्ट कापले, अन पोलिसांनी युवतीचा मृतदेह तिच्या आई वडिलांकडे न सोपविता परस्पर अंत्यसंस्कार केले. या घटनेचा हिंगोली येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करून सदरील प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती यांना केली आहे.
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका युवतीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. यानंतर तिला मारहाण करण्यात आली. यात तिचा मान मणक्याला इजा झाली. यानंतर उपचारादरम्यान सदर युवतीचा मृत्यू झाला. मात्र, मृत्यू झाल्यानंतर युवतीचा मृतदेह आईवडिलांकडे न सोपविता पोलिसांनी परस्पर त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.
त्याचाच एक भाग म्हणून हिंगोली येथेही वंचित बहुजन आघाडीच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रपती यांच्याकडे केली आहे. तसेच महिला काँग्रेसच्या वतीने देखील याच घटनेप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
राहुल गांधींना धक्काबुक्की -
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी गुरुवारी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जात असताना त्यांना यमुना एक्सप्रेस पोलिसांनी थांबवले. यावेळी फक्त दोघांनाच पुढे जाण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसोबत पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, यावेळी पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की झाली. या घटनेचाही सर्व स्तरांतून निषेध व्यक्त होत आहे.