ETV Bharat / state

हिंगोलीत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी गोवंशासह शस्त्र पकडली - Sengaon

कळमनुरी शहरातून कत्तलीसाठी जाणारे गोवंशाचे वाहन हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.या प्रकरणी पोलिसांनी शेख कलिम शेख चाँद, शेख लिकायत शेख शौकत (दोघेही रा. पुसेगाव) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी गोवंशासह शस्त्र पकडली
author img

By

Published : Aug 10, 2019, 4:02 AM IST

हिंगोली - कळमनुरी शहरातून कत्तलीसाठी जाणारे गोवंशाचे वाहन हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या वाहनात धारदार शस्त्रास्त्रे आढळून आले असून पाच गोवंशाचे जीव या कार्यकर्त्यांमुळे वाचले आहे. विशेष म्हणजे, सकाळी साडेसात वाजता ही घटना घडून देखील सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. मात्र उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला.

हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी गोवंशासह शस्त्र पकडली

या प्रकरणी पोलिसांनी शेख कलिम शेख चाँद, शेख लिकायत शेख शौकत (दोघेही रा. पुसेगाव) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कळमनुरी येथे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास गोवंशाची तस्करी करणारे वाहन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी कार्यकर्त्यांनी तत्परता दाखवत अवैध वाहतूक करणाऱ्या (एम.एच. ३८ एक्स ००४७) मालवाहू टेंम्पोला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र सदरील वाहन चालकाने भरधाव वेगाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्त्यांनी त्या वाहनाचा पाठलाग करुन त्याला अडविले.

यावेळी मालवाहू टेंम्पोतून सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथून नांदेड जिल्ह्यातील अर्धापूरकडे बकरी ईदच्या कत्तलीसाठी गोवंश घेऊन जात असल्याचे वाहन चालकाने कार्यकर्त्यांना सांगितले. या वाहनात क्रूरपणे पाच गोवंश कोंबले होते. तसेच कत्तलीसाठी वापरले जाणारे धारदार शस्त्रही वाहनात आढळून आले. ही घटना सकाळी सात वाजता घडली. मात्र, पोलिसांनी सायंकाळी उशिरा गुन्ह्याची नोंद केली.

कळमनुरी येथील हिंदुत्ववादी कार्यकर्ते शिवा शिंदे, अंकुश पाटील, कुणाल खर्जुले, अमोल दिपके, हरीष भोसले, योगेश संगेकर, भागवत ठाकुर, गोपाल काकडे यांनी संबंधीत आरोपींविरुध्द महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा तसेच अन्य कलमान्वये गुन्हा नोंदविण्याची पोलिसांकडे मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र या घटनेतून अजूनही गोहत्या सुरुच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा सज्ज असणे फार गरजेचे आहे.

Intro:

हिंगोली - कळमनुरी शहरातून कत्तलीसाठी जाणारे गोवंशाचे वाहन हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या वाहनात धारदार शस्त्रास्त्रे देखील आढळून आले असून पाच गोवंशाचे जीव या कार्यकर्त्यांमुळे वाचले आहेत. विशेष म्हणजे सकाळी साडेसात वाजता घटना घडून देखील सायंकाळी पाच वाजेपर्यंत गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती. मात्र उशिराने गुन्हा दाखल केला आहे.
Body:शेख कलिम शेख चाँद, शेख लिकायत शेख शौकत दोघेही रा. पुसेगाव या दोघविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कळमनुरी येथे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास गोवंशाची तस्करी करणारे वाहन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले. कार्यकर्त्यांनी तत्परता दाखवली अन त्या अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनास थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र सदरील वाहन चालकाने भरधाव वेगाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तर कार्यकर्त्यांनी त्या वाहनाचा पाठलाग करुन ते वाहन अडविले. एम.एच. ३८ एक्स ००४७ या कार्यक्रमांकाच्या मालवाहु टेंम्पोतून सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथून नांदेड जिल्ह्यातील अर्धापुरकडे बकरी ईदच्या कत्तलीसाठी हे गोवंश घेऊन जात असल्याचे सदरच्या वाहन चालकाने कार्यकर्त्यांना सांगितले. या वाहनात क्रूरपणे पाच गोवंश कोंबले होते. तसेच कत्तलीसाठी वापरले जाणारे धारदार शस्त्रही वाहनात आढळून आलीे.ही घटना सकाळी सात वाजता घडली. घटनेत पोलिसांनी अतिशय संथ गतीने गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरुच ठेवली होती. सायंकाळी उशिरा नोंद झाली. कळमनुरी येथील हिंदुत्ववादी कार्यकर्ते शिवा शिंदे, अंकुश पाटील, कुणाल खर्जुले, अमोल दिपके, हरीष भोसले, योगेश संगेकर, भागवतठाकुर, गोपाल काकडे यांनी संबंधीत आरोपींविरुध्द महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा तसेच अन्य कलमान्वये गुन्हा नोंदविण्याची मागणी पोलिसांकडे केली होती. त्या नुसार गुन्हा दाखल केलाय. अजून गोहत्या सुरुच असल्याचे या घटनेवरून समोर आलंय.Conclusion:त्यामळे पोलीस यंत्रणा सज्ज असणे फार गरजेचे आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.