ETV Bharat / state

'बँकेत पैसे काढण्यासाठी दिवसभर रांगेत उभे राहतोय; मात्र शेवटी रिकाम्या हातानंच परतावं लागतंय' - hingoli corona update news

सणासुदीचे दिवस असल्याने प्रत्येकजण शहरी ठिकाणी धाव घेत आहे, तर कोरोना कालावधीमध्ये राहिलेली खरेदी आता पूर्ण करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांसह नागरिक करत आहेत. मात्र, बँकेची व्यवस्था बंद असल्याने शेतकर्‍यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे सकाळपासून रांगेत थांबल्यानंतर जेव्हा कधी बँक ग्राहकाचा नंबर येतोय त्याला काहीतरी वेगळे कारण सांगून माघारी पाठवून दिले जात आहे.

farmer return empty hand due to rush in bank at hingoli

author img

By

Published : Aug 24, 2020, 3:55 PM IST

हिंगोली - कोरोनामधून कसाबसा सावरलेला शेतकरी उभारी घेण्याचा प्रयत्न करतोय. लॉकडाऊन काळात सर्व बँकेचे व्यवहारही ठप्प झाले होते. मात्र, आता हिंगोली जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात न आल्याने शेतकरी हे अर्धवट राहिलेली बँकेची कामे त्याचबरोबर बँकेतून रक्कम काढण्यासाठी दिवसभर रांगेत उभे राहत आहेत. मात्र, काहीतरी कारण सांगून शेवटच्या टप्प्यात त्यांना माघारी पाठविण्यात येत असल्याची खंत हिंगोली येथील मध्यवर्ती बँकेत झालेल्या एका शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.

दुसरीकडे मात्र जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी शेतकऱ्यांची बँकेमध्ये गर्दी पाहता बँकेतून मिटवा पद्धतही सुरू करण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे आता येथून पुढे बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी येणार्‍यांची गैरसोय टाळण्यासाठी मदत होणार आहे.

सणासुदीचे दिवस असल्याने प्रत्येक जण शहरी भागात धाव घेत आहेतस, तर कोरोना कालावधीमध्ये राहिलेली खरेदी आता पूर्ण करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांसह नागरिक करत आहेत. मात्र, बँकेची व्यवस्था बंद असल्याने शेतकर्‍यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे सकाळपासून रांगेत थांबल्यानंतर जेव्हा कधी बँक ग्राहकाचा नंबर येतोय. त्याला काहीतरी वेगळे कारण सांगून माघारी पाठवून दिले जात आहे. त्यामुळे शेतकरी हे आता चिंतातुर झाले आहेत. ही परिस्थिती शेतकऱ्याची नव्हे तर नागरिकांना देखील बँकेच्या या आडमुठ्या धोरणाचा फटका सहन करावा लागत आहे.

बँकेच्या दारावर उभ्या असलेला सेवक हा जणूकाही तो शाखा व्यवस्थापक असल्यासारखी वागणूक शेतकऱ्याना देत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिक आता गोंधळून गेलेले आहेत. या गंभीर प्रकाराकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन शेतकर्‍यांचा गंभीर प्रश्न सोडविण्याची मागणी आता नागरिकांसह सर्वच शेतकऱ्यांतून होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.