हिंगोली- येथील जिल्हा सामान्य रुग्णालया पाठोपाठ आता कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयातही असुविधा चव्हाट्यावर आल्या आहेत. अपुऱ्या सुविधा असल्यामुळे येथील डॉक्टरांनीच बंद पाळला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे आरोग्य विभागाकडे साफ दुर्लक्ष होत आहे. आरोग्य प्रशासन रुग्णांची चांगलीच हेळसांड करत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांमुळे डॉक्टरांनी सिजरिंगचा फंडा गाजवला आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना चांगलेच वेठीस धरले जाते. रुग्णालयात सोयी-सुविधा नसल्याने रुग्णांचे नातेवाईक थेट डॉक्टरांवर धावून गेल्याचा प्रकारही येथे घडला आहे. हा प्रकार एकदा दोनदा नव्हे तर अनेकदा घडल्याने येथे कार्यरत असलेले डॉक्टरही भयभीत झाले आहे. त्यामुळे शुक्रवारी डॉक्टरांनी एकत्र येत रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच बंद पाळला आहे. डॉक्टरांनी केलेल्या आंदोलनामुळे रुग्णांला फटका बसल्याचे दिसून आले.