हिंगोली- या देशात सर्वच प्रकारच्या निवडणुका अतिशय शांततेत पार पडतात, त्यात तेवढे काही राजकारण होत नाही. मात्र सर्वात वाईट निवडणूक असेल तर ती आहे सरपंचपदाची, घराघरांमध्ये या पदासाठी प्रचंड गोंधळ होतो. त्यामुळे हेच सरपंच पद जनतेतून निवडून आणण्याचा अतीशय महत्वपूर्ण निर्णय आमच्या सरकारच्या काळात घेतला होता. मात्र हे देखील या सरकरला अजिबात मान्य नाही. तसेही भाजप सरकारने घेतलेला कोणताच निर्णय या सरकारला पटत नसल्याने, त्यावर स्थगिती देण्याचा कारभार या आघाडी सरकारून केला जात असल्याची टीका माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे.
शिक्षकांचे व पदवीधरांचे अनेक प्रश्न आहेत. मात्र ते प्रश्न गेल्या बारा वर्षापासून सत्तेत असलेल्या पदवीधर आमदाराने अजिबात मार्गी लावलेले नाहीत. आजही प्रत्येक शहरात शिक्षकांना अनेक अडचणींनाचा सामना करावा लागतोय, पेन्शन योजनाचे तर अजूनही भिजत घोंगडे आहे. अंशकालीनचा आशा किती तरी समस्या या अजूनही अनुत्तरीच आहेत. त्यामुळे त्या समस्या सोडविण्यासाठी हा उमेदवार सरस ठरेल.
प्रत्येक योजनेला भोपळा देण्याचं काम करतय सरकार-
आमच्या या सरकारच्या काळांमध्ये जनतेच्या हिताच्या योजना राबविण्यात आलेल्या आहेत. आज खेड्या पाड्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे रस्ते पोहोचले आहेत. जलयुक्त शिवार योजनेने तर शेतकरी आनंदी झाले. मात्र या सरकारला त्यात चुका काढण्यात समाधान वाटते असल्याची टीका त्यांनी महाविकास आघाडीवर केली.
मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही अनुत्तरीच-
मराठा आरक्षणाला अजूनही न्याय देण्याचे काम कोणत्याही नेत्याने केले नाही. भगवान गडावर गोपीनाथ मुंडे साहेबाचा कार्यक्रम होता अन त्या कार्यक्रमास संभाजीराजे छत्रपती हे देखील होते, तेव्हा त्यांनी सांगितले होते की, वर्षानुवर्षे मराठा समाजाकडे सत्तेची सूत्रे होती, मात्र माझ्या मराठा समाजाला आरक्षण बाबतीत न्याय मिळाला नाही. शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात मराठा तरुण अनेक प्रश्न घेऊन फिरत आहे. मात्र काहीही उपयोग नाही. बदल करायचा असेल तर आलेली संधी अजिबात न घालण्याचे आवाहन माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी पदवीधर मतदारांना केले आहे.