ETV Bharat / state

सावधान! हिंगोलीत बर्ड फ्लूचा शिरकाव; भोपाळच्या प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त - hingoli bird flu update news

भोपाळ येथील प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त होताच जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तातडीची बैठक घेतली. बैठकीत प्राण्यांमधील संक्रमण रोखणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी जयवंशी यांनी आदेश काढले आहेत.

बर्ड फ्लू
बर्ड फ्लू
author img

By

Published : Jan 21, 2021, 9:55 PM IST

हिंगोली- जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कळमनुरी तालुक्यातील पिंपरी खुर्द येथे 24 कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्ल्यूने झाल्याचा अहवाल भोपाळ प्रयोगशाळेने आज दिला आहे.

पंडित मारोती धांडे (रा. पिंपरी खुर्द) या शेतकऱ्याच्या शेतात 16 जानेवारीला अचानक कोंबड्यांचा मृत्यू झाला. अगोदर बर्ड फ्लूने खळबळ उडालेली असल्याने या मृत कोंबड्याची माहिती पशुसंवर्धन विभागाला कळविली. पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक उपाआयुक्त डॉ. एल. एस.पवार व सहाय्यक आयुक्त डॉ. एस. पी. पवार यांनी पथकासह त्या ठिकाणी धाव घेतली. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर गावात पाहणी केली. मृत कोंबड्याचे नमुने भोपाळ येथील प्रयोग शाळेत पाठविले. हा अहवाल आज प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार बर्ड फ्लूमुळेच कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा-नागपुरात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव; ४६० कोंबड्यांचा पशु संवर्धन विभागाकडून खात्मा

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली तातडीची बैठक-
भोपाळ येथील प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त होताच जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तातडीची बैठक घेतली. बैठकीत प्राण्यांमधील संक्रमण रोखणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी जयवंशी यांनी आदेश काढले आहेत. पिंपरी खुर्द या गावच्या परिसरातील एक किलोमीटर अंतरावर संक्रमित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या परिसरातील संक्रमित क्षेत्रामधून कुक्कुट पक्षी तसेच पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांचे सर्वेक्षण करून त्यांना नष्ट करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जयवंशी यांनी पशुसंवर्धन विभागाला दिले आहेत. त्याचबरोबर 90 दिवसापर्यंत परिसरातील दहा किलोमीटर अंतरावरील गावातून कोंबड्या व अंडे यांच्या वाहतुकीवरदेखील बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचा-ठाण्यात 483 पक्षांचा मृत्यू; कोरोनानंतर बर्ड फ्ल्यूच्या शिरकावाने नागरिक चिंतित

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळे झाल्याने पिंपरी खुर्द परिसरातील ग्रामस्थामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुक्कुटपालन करणारे शेतकरीदेखील भयभीत झाले आहेत. बर्ड फ्लूमुळे लाखो रुपयांचे नुकसान होईल, अशी चिंता कुक्कुट व्यवसायिकाना भेडसावत आहे. कोरोनाच्या संकटातून अजूनही न सावरलेले अनेकजण बर्ड फ्लूच्या संकटाने धास्तावले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.