हिंगोली - जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. बुधवारी जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार, एकाच दिवशी 174 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याची माहिती शल्यचिकित्सक डॉ. राजेश सूर्यवंशी यांनी दिली. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांचा वाढता आकडा हिंगोली वाशियांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. प्रशासकीय व आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज आल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले.
हिंगोली प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार, बुधवारी हिंगोली परिसरात 10, वसमत परिसरात 29, कळमनुरी परिसरात 2 आणि औंढा परिसरात 16, सेनगाव परिसरात 35 रुग्ण हे रॅपिड अँटीजण टेस्टमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आरटीपीसीआरमध्ये हिंगोली परिसरात 25, वसमत 26, कळमनुरी 19, सेनगाव 6, औंढा नागनाथ परिसरात सहा असे एकूण 174 कोरोना बाधित रुग्ण नव्याने आढळले आहेत. तर 128 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना कोरोना वार्डमधून सुट्टी देण्यात आली आहे. तर आज सहा कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्ण संख्येत ज्याप्रमाणे वाढ होत चालली आहे. त्याच तुलनेत कोरोना बाधित रुग्ण हे बरे होण्याचे प्रमाण देखील वाढलेले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 6 हजार 567 कोरोना बाधित रुग्णसंख्या झाली असून, 5 हजार 716 एवढे रुग्ण हे बरे झालेले आहेत. त्या रुग्णाला रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 761 कोरोना बाधित रुग्णांवर विविध कोरोना वार्डमध्ये उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 90 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
हेही वाचा - 'ईटीव्ही भारत' विशेष - गुलाबाच्या शेतीतून महिलांनी मिळवले स्वयंरोजगाराचे साधन
हेही वाचा - हिंगोलीतील पुसेगावात मनोरुग्णाने केली मावशी आणि आजीची हत्या