ETV Bharat / state

देशात पहिल्यांदाच शालेयस्तरावर मधुमेह जागृती कार्यक्रम गोव्यात - goa

सार्वजनिक-खासगी भागिदारीच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यासाठी कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सबिलीटी चांगल्या पद्धतीने पार पाडणाऱ्या सनोफी या आघाडीच्या औषध निर्मात्या कंपनीशी ३ वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. गोव्याचे आरोग्य संचालक डॉ. संजीव दळवी यांनी सरकारच्यावतीने तर सनोफीच्यावतीने कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एन. राजाराम यांनी करारावर सही केली. यावेळी गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे आणि आरोग्य खात्याचे सचिव जे. अशोक कुमार उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून २ हजार शाळांमधील सुमारे दीड लाख मुलांपर्यंत याची माहिती पोहचवली जाणार आहे. मुलांबरोबर शिक्षकांनाही प्रशिक्षित केले जाणार आहे.

मधुमेह
author img

By

Published : Feb 2, 2019, 11:18 AM IST

पणजी - गोव्यातील मधुमेहाचे वाढते प्रमाण गंभीर स्वरूपाचे आहे. त्यामुळे त्याला आटोक्यात आणण्यासाठी बालवयातच जागृती करणे आवश्यक आहे. यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत ' किड्स' ( किड्स अँड डायबेटीज इन स्कूल) उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी सनोफी इंडियासोबत गोवा आरोग्य खात्याने आज सामंजस्य करार केला, अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच उपक्रम आहे.यावेळी बोलताना आरोग्यमंत्री राणे म्हणाले, गोव्यातील लोकसंख्येचा विचार करता मधुमेहाचे प्रमाण १० टक्के आहे. त्यामुळे त्यावर वेळीच आळा घालण्यासाठी जागृती करणे आवश्यक आहे. मुलांना याविषयी माहिती देण्यासाठी शाळांमध्ये सनोफीच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रशिक्षित केले जाणार आहे.

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एन. राजाराम म्हणाले, किड्स कार्यक्रमाच्या माध्यमातून दवाखाने, इस्पितळे, शाळा आणि घरोघरी माहिती दिली जाणार आहे. योग्य बदल होण्याच्या दृष्टीने अंमलबजावणी केली जाणार आहे.

Intro:पणजी : गोव्यातील मधुमेहाचे वाढते प्रमाण गंभीर स्वरूपाचे आहे. त्यामुळे त्याला आटोक्यात आणण्यासाठी बालवयातच जाग्रुती करणे आवश्यक आहे. यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत ' किड्स' ( किड्स अँड डायबेटीज इन स्कूल) उपक्रम राबविणार आहे. यासाठी सनोफी इंडियासोबत गोवा आरोग्य खात्याने आज सामंजस्य करार केला. अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच उपक्रम आहे.

Body:सार्वजनिक-खाजगी भागिदारीच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यासाठी कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सबिलीटी चांगल्या पद्धतीने पार पाडणाऱ्या सनोफी या आघाडीच्या औषध निर्मात्या कंपनीशी तीन वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. गोव्याचे आरोग्य संचालक डॉ. संजीव दळवी यांनी सरकारच्यावतीने तर सनोफीच्यावतीने कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एन. राजाराम यांनी करारावर सही केली. यावेळी गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे आणि आरोग्य खात्याचे सचिव जे. अशोक कुमार उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून २ हजार शाळांमधील सुमारे दीड लाख मुलांपर्यंत याची माहिती पोहचवली जाणार आहे. मुलांबरोबर शिक्षकांनाही प्रशिक्षित केले जाणार आहे.
यावेळी बोलताना आरोग्य मंत्री राणे म्हणाले, गोव्यातील लोकसंख्येचा विचार करता मधुमेहाचे प्रमाण १० टक्के आहे. त्यामुळे त्यावर वेळीच आळा घालण्यासाठी जाग्रुती आवश्यक आहे. मुलांना याविषयी माहिती देण्यासाठी शाळांमध्ये सनोफी च्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रशिक्षित केले जाणार आहे.
तर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एन. राजाराम म्हणाले, किड्स कार्यक्रमाच्या माध्यमातून दवाखाने, इस्पितळे, शाळा आणि घरोघरी माहिती दिली जाणार आहे. योग्य बदल होण्याच्या द्रुष्टीने अंमलबजावणी केली जाणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.