ETV Bharat / state

महिला दिन विशेष : गोंदियात गृहिणींचा 'एक दिन सायकल के नाम' उपक्रम

घरातील महिलेचे आरोग्य चांगले असले तर कुटुंबाचेही आरोग्य चांगले राहते असे म्हटले जाते. मात्र कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना महिलांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही.

महिला दिन विशेष : गोंदियात गृहिणींचा 'एक दिन सायकल के नाम' उपक्रम
महिला दिन विशेष : गोंदियात गृहिणींचा 'एक दिन सायकल के नाम' उपक्रम
author img

By

Published : Mar 7, 2021, 4:10 PM IST

गोंदिया : घराची जबाबदारी आपल्या खांद्यावर सक्षमपणे पेलतात म्हणून महिलांना आदराने होम मिनिस्टरही म्हटले जाते. गोंदियातील याच होम मिनिस्टर्सनी अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा केला. 'एक दिन साइकिल के नाम' या उपक्रमात सहभागी होत पर्यावरण आणि आरोग्य रक्षणाचा संदेशही त्यांनी दिला.

गोंदियात गृहिणींचा 'एक दिन सायकल के नाम' उपक्रम

एक दिन सायकल के नाम
घरातील महिलेचे आरोग्य चांगले असले तर कुटुंबाचेही आरोग्य चांगले राहते असे म्हटले जाते. मात्र कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना महिलांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे महिलांना लठ्ठपणा, शारीरिक कमजोरी अशा समस्यांना सामोरे जावे लागते. छोट्या त्रासाकडे वेळीच लक्ष न दिल्याने अनेकदा गंभीर आजारपणाचाही त्यांना सामना करावा लागतो. हेच लक्षात घेत गोंदियातील महिलांनी एकत्र येत स्वतःच्या आरोग्याविषयी महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी 'एक दिन साइकिल के नाम' या उपक्रमाचे आयोजन केले.

विविध क्षेत्रातील महिलांचा सहभाग

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमा अंतर्गत रविवारी महिलांनी शहरातून सायकल चालवत पर्यावरण तसेच आरोग्याविषयी जनजागृती केली. या उपक्रमात शहरातील डॉक्टर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्त्या, गृहिणींनी सहभाग नोंदविला. महिला फिट तर कुटुंब सुपरहिट अशा संदेश या महिलांनी या उपक्रमातून दिला. गेल्या तीन वर्षांपासून या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. जेसीआय गोंदिया राइज सिटी आणि आज फोरमने या उपक्रमाचे आयोजन केले होते.

खर्चाची बचत व आरोग्यासाठी लाभदायक
सायकल चालविण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मात्र आरोग्यासोबतच खर्चाचीही बचत सायकलमुळे होत असते. सायकल चालविल्याने शरीराची पूर्ण हालचाल होत असल्याने आरोग्य उत्तम राहते. त्यामुळे सायकलचा आपल्या दैनंदिन जीवनशैलीत समावेश केला पाहिजे असे मत व्यक्त होताना दिसत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.