गोंदिया - देवरी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील ससीकरण मंदिराजवळ बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला. ट्रक कोहमाऱ्याकडून देवरीकडे जात होता. यावेळी ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकचा अपघातात होवून ट्रकला आग लागली. ही घटना रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीत ट्रक जळून खाक झाला.
हेही वाचा - सालेकसातील सागवनाची छत्तीसगढमध्ये तस्करी, ३ चोरट्यांना अटक
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस मित्रांनी दिलेल्या माहितीवरून गोंदिया आणि देवरीच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी उशिरा आल्याने संपूर्ण ट्रक आणि माल जळून खाक झाला. राष्ट्रीय महामार्ग 6 वर भंडारा जिल्ह्यातील साकोली अशोका टोल नाक्याकडे कोणत्याही प्रकारचे अग्निशामक वाहन, रुग्णवाहिका, क्रेन उपलब्ध नाहीत. त्यामुळे एखादा अपघात झाल्यास वेळेवर सुविधा मिळत नाही.