ETV Bharat / state

तिरोडा पोलिसांची 10 अवैध दारू अड्ड्यांवर धाड, 3.87 लाखांचा माल जप्त

तिरोडा शहरातील संत रविदास वॉर्डातील अवैध मोहफुलांच्या दारू गाळण्याच्या 10 अड्ड्यांवर एकाच वेळी छापा घालण्यात आला. या छाप्यामध्ये एकूण तीन लाख 86 हजार 850 रूपयांचा माल जप्त करून एकूण 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

तिरोडा पोलिसांची 10 अवैध दारू अड्ड्यांवर धाड

author img

By

Published : Feb 20, 2021, 7:37 PM IST

गोंदिया - तिरोडा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलीस ठाण्यात पोलीस व होमगार्डचे यांचे 10 विशेष वेगवेगळे पथक तयार करण्यात आले. तिरोडा शहरातील संत रविदास वॉर्डातील अवैध मोहफुलांच्या दारू गाळण्याच्या 10 अड्ड्यांवर एकाच वेळी छापा घालण्यात आला. या छाप्यामध्ये एकूण तीन लाख 86 हजार 850 रूपयांचा माल जप्त करून एकूण 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई 20 फेब्रुवारी रोजी करण्यात आली आहे.

यांच्यावर झाली कारवाई
श्यामराव श्रीराम झाडे हा आपल्या घरी मजूर रोहित बाबुराव बरयिकर, संजय रामा शहारे, कुलदीप अंताराम भोयर यांच्यासोबत दारूची भट्टी लावून दारू काढताना आढळले. त्यांच्याकडून रनींग भट्टी, साहित्य, 30 लिटर मोहफुलांची दारू, 20 प्लास्टिक पोत्यात सडवा मोहफूल असा एकूण 38 हजार 750 रूपयांचा माल जप्त करण्यात आला. शिला विनोद खरोले हिच्या घरातून 91 प्लास्टिक पोत्यात 1820 किलो सडवा मोहफुल ज्याची एकूण किंमत एक लाख 46 हजार 850 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. माया प्रकाश बरियेकर व सुरज प्रकाश बरियेकर यांच्या घरी 55 प्लास्टिक पोत्यात 1100 किलो सडवा मोहफूल, साहित्य असा एकूण 89 हजार 250 रूपयांचा माल जप्त करण्यात आला.
शकील रहीमखा पठाण याच्या घरी कंपाउंडमध्ये 70 प्लास्टिक पोत्यात एकूण 1400 किलो सडवा मोहफूल, हातभट्टी साहित्य असा एकूण 1 लाख 12 हजार रूपयांचा माल जप्त करण्यात आला.

तीन लाख 86 हजार 850 रूपयांचा माल जप्त

एकूण 3 लाख 86 हजार 850 रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश पारधी, सहायक पोलीस निरीक्षक ईश्वर हनवते, पोलीस उपनिरीक्षक केंद्रे, महिला पोलीस उपनिरीक्षक राधा लाटे, नाईक पोलीस शिपाई मुकेश थेर, श्रीरामे बर्वे, पोलीस शिपाई अंबाडे, अंबुले, पंकज सवालाखे, प्रशांत काहलकर, महिला पोलीस शिपाई भूमेश्वरी तिरीले यांनी केली आहे.

हेही वाचा - ...तर महाराष्ट्रासह केरळच्या नागरिकांना कर्नाटक प्रवेश बंद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.