ETV Bharat / state

Car And Truck Accident : भरधाव ट्रकचा टायर फुटून झालेल्या अपघातात काळी-पिवळीमधील तिघांचा मृत्यू

author img

By

Published : Nov 16, 2022, 10:48 PM IST

ट्रक व काळी-पिवळी वाहनामध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात (Car And Truck Accident Gondia) काळी-पिवळी वाहनातील प्रवासी एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोन जणांचा गोंदिया येथील रुग्णालयात नेत असताना वाटेत मृत्यू (Three died Car and Truck Accident) झाला. Latest news from Gondia, gondia crime

Car And Truck Accident
ट्रक व काळी-पिवळी अपघात

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील डुंगीपार पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोंदिया ते कोहमारा मार्गावर पाटेकुर्रा गावाजवळ ट्रक व काळी-पिवळी वाहनामध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात (Car And Truck Accident Gondia) काळी-पिवळी वाहनातील प्रवासी एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोन जणांचा गोंदिया येथील रुग्णालयात नेत असताना वाटेत मृत्यू (Three died Car and Truck Accident) झाला. सहा जण जखमी (six injured in Accident Gondia) झाले. ही घटना बुधवारी (ता. १६) सकाळी सव्वानऊच्या सुमारास कोहमारा ते गोंदिया मार्गावरील पाटेकुर्रा येथे घडली. Latest news from Gondia, gondia crime

Car And Truck Accident
अपघातात वाहनाचा झालेला चुराडा

ही आहेत मृतांची नावे- श्यामसुंदर किसनलाल बंग (वय ७८, रा. गोरेगाव), अंबिका गोकूळ पांडे (वय ६३, रा. चिरचाडी, ता. सडक अर्जुनी) व सूरज शंकर मुनेश्वर (वय २४, रा. कालीमाटी, ता. आमगाव) अशी मृतांची नावे आहेत.

टायर फुटल्याने झाला अपघात- एमएच ३६/३१११ क्रमांकाचे काळी-पिवळी वाहन कोहमारा येथून प्रवासी घेऊन गोंदिया कडे जात होते, तर एमएच ४०/ वाय ८४८७ क्रमांकाचा ट्रक गोंदिया येथून कोहमाराकडे जात होता. पाटेकुर्राजवळ ट्रकचा समोरील डाव्या बाजूचा टायर फुटल्याने ट्रक काळी-पिवळी वाहनावर आदळला. यात चालकाच्या बाजूला बसलेले श्यामसुंदर बंग यांचा जागीच मृत्यू झाला. अंबिका गोकूळ पांडे, सूरज शंकर मुनेश्वर, साकीर अली अकबर अली (वय ४९, रा. सडक अर्जुनी), वनिता अनिल भेंडारकर (वय २८, रा. चिखली), मनीषा पवनलाल चिखलोंढे (वय २५, रा. गोंदिया), प्रणोल सतीश राठोड (वय १५, रा. भुसारीटोला) व अन्य दोन असे आठजण जखमी झाले.

ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल - यातील जखमींना गोंदियाच्या केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत असताना जखमींपैकी अंबिका पांडे आणि सूरज मुनेश्वर यांचा वाटेत मृत्यू झाला. जखमी सहा जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद डुग्गीपार पोलिसांनी केली असून, ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या अपघाता मुळे जिल्हा रुग्णालयात पोलिस बंदोबस्त लावण्यात आले, आहेपुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.