गोंदिया - सध्या सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. मात्र, गोंदिया जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर ९८.५ टक्के असून मृत्यू दर १.२५ टक्के आहे. जिल्हातील आतपर्यंत २१५ जण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहे. कोरोनाबाधितत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल आहे. तर एकीकडे कोरोनाच्या रुग्ण बरे होण्याचा प्रमाणात अव्वल असले तरी दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.
सोमवारी गोंदियामध्ये नऊ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. चाचणी अहवाल गोंदियाच्या प्रयोगशाळेतून प्राप्त झाला आहे. तसेच चार रुग्ण बरे झाले असून घरी परतले आहे. वाढत्या बाधितांच्या संख्येमुळे जिल्ह्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 24 वर पोहचली आहे. तर एकूण बाधित रुग्णांची संख्या 256 इतकी आहे. कोरोनामुक्त झालेले चार रुग्ण रुग्ण असून यामध्ये सालेकसा तालुक्यातील एक, गोंदिया तालुक्यातील एक आणि तिरोडा तालुक्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत 223 बाधित रुग्ण हे कोरोनावर मात करून घरी परतले आहे. सोमवारी जिल्ह्यात आणखी 9 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत. यामध्ये देवरी तालुक्यातील आठ रुग्ण आणि तिरोडा तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 256 झाली आहे. रॅपिड अँटिजेन टेस्टमधून सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. प्रयोगशाळा चाचणी, अँटिजेन टेस्ट आणि बाहेर जिल्हा व राज्यात आढळून आलेल्या जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 256 झाली आहे. विषाणू प्रयोगशाळा चाचणीतून 8 हजार 242 नमुने निगेटिव्ह तर 245 नमुने पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.
31 जणांचा कोरोना अहवाल प्रलंबित असून 105 जणांच्या अहवालाबाबत अनिश्चितता आहे. जिल्ह्याबाहेर चार रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये नागपूर येथे तीन आणि एक रुग्ण बंगळुरू येथील आहे. जिल्ह्यातील विविध संस्थात्मक विलगिकरण कक्षात 171 आणि गृह विलगिकरणात 1106 असे एकूण 1277 व्यक्ती विलगिकरणात आहे. कोरोना संशयित रुग्णांचा शोध रॅपिड अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. यामध्ये आजपर्यंत जिल्ह्यातील 1280 व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये 1273 अहवाल निगेटिव्ह आले.
राज्यातील कोरोना परिस्थिती -
राज्यात सोमवारी 7 हजार 924 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 3 लाख 83 हजार 723 अशी झाली आहे. तसेच नवीन 8 हजार 706 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2 लाख 21 हजार 944 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1 लाख 47 हजार 592 सक्रिय रुग्ण आहेत.