गोंदिया - एका जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील 52 वर्षीय शिक्षकाला वर्गातील विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती गोंदिया पोलिसांनी सोमवारी दिली आहे. तक्रारीच्या आधारे, कलम 354 (POCSO) कायद्याच्या इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
जिल्हा परिषद शाळेतील प्रकार - गोंदिया जिल्ह्यातील डांगोर्ली येथील जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडला आहे. हा शिक्षक या शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. 11 मार्च रोजी गट शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर त्या शिक्षकाला अखेर अटक करण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले आहे.
चौकशीनंतर गुन्हा दाखल - मुलींच्या तक्रारीनुसार, आरोपीने इयत्ता 5वीत शिकणाऱ्या आठ मुलींना काही अश्लील व्हिडिओ दाखवले होते. तसेच तो शिक्षक गेल्या महिन्यात मुलींना अयोग्यरित्या स्पर्शही करत होता. मुलींनी त्यांच्या पालकांना याबाबत माहिती दिली. लगेच पालकांनीही शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधला व याबाबत चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर याबाबत सोखल चौकशी झाल्यानंतर या शिक्षकाविरोधाक गुन्हा दाखल करत त्याला अखेर अटक केली आहे.
कोल्हापुरात घडला होता प्रकार - दरम्यान, असाच एक प्रकार दानेवारी महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातील एका शाळेत समोर आला होता. एका शिक्षकाने शाळेतील मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत विद्यार्थिनींसोबत गैरकृत्य केल्याची घटना समोर आली होती. व्ही.पी. बांगडी असे या शिक्षकाचे नाव होते. त्या विद्यार्थींनींनी पालकांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला होता.
कोल्हापुरातील हा प्रकार - महिनाभरापासून सुरू होता. याबाबत संबंधित पीडित विद्यार्थिनींनी पालकांना घडलेली घटना सांगितली. संतप्त झालेल्या पालकांनी शाळेतील मुख्याध्यापकांना याबाबतची तक्रार केल्यानंतर संबंधित शिक्षक पुन्हा मुलींना धमकी देण्याचे प्रकार करू लागला होता. लगेच मुख्याध्यापकांनी गावच्या पोलीस पाटलांना बोलवून घडलेल्या घटनेची माहिती दिली. यामुळे गावकऱ्यांनी त्याची बदली करण्याची मागणी केली होती. त्यानुसार शिक्षकाचे सातारा जिल्ह्यात बदली करण्याचे आदेश मुख्याध्यापकांनी दिले होते.