गोंदिया - गणपती विसर्जनानंतर म्हणजेच अनंत चतुर्दशी समाप्त झाल्यानंतर पितृमोक्ष पंधरवाडा सुरू होतो. पितृमोक्ष अमावस्या झाल्यावर घटस्थापनेला सुरुवात होत असते. यावर्षी अश्विन मासारंभ शारदीय नवरात्र २९ सप्टेंबरपासून होणार आहे. याच दिवशी देवीचे भक्त घटस्थापना करतात. त्यानिमित्ताने देवीदेवतांच्या मंदिराच्या रंगरंगोटीच्या कामाला सुरुवात झाली आहे. देवी भक्तांना आता नवरात्रीचे वेध लागले आहेत.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी नवरात्रोत्सव भक्तीभावाने साजरा करण्यात येतो. अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवासाठी गोंदियात देवीच्या मूर्ती बनविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. यंदा जवळपास एक हजार मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. गोंदियात गणेश मूर्ती तयार करणारे कारागीर मोठ्या संख्येने आहेत. २५ पेक्षा अधिक ठिकाणी मूर्ती तयार करणारे दाखल झाले आहेत. या ठिकाणी हजारो मूर्ती तयार होतात.
गणेशोत्सव संपल्यानंतर मूर्तीकारांना नवरात्रोत्सवाचे वेध लागतात. अर्थात काही मोजकेच कारागीर देवीच्या मूर्ती तयार करीत असतात. तरीही जवळपास आठशे ते हजार मूर्ती शहरातून तयार होऊन विक्रीसाठी जातात. सध्या शहरातील पाच ते सात कारागीर त्यासाठी मेहनत घेत आहेत. अवघ्या दोन फुटांपासुन सात ते १५ फुटपर्यंतच्या मूर्ती तयार करण्यात येत असतात. येत्या दोन दिवसात रंग काम पूर्ण होणार व मूर्ती तयारही होणार असल्याचे कारागिरांनी सांगितले. गोंदियासह लगतच्या जिल्ह्यांमध्ये नवरात्रोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्याचे प्रमाण वाढले आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास दोनशे मूर्ती अधिक तयार करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - गोरेगावात खोट्या स्वाक्षरीने विद्यार्थीनीच्या खात्यातून काढले पैसे; अद्याप कारवाई नाही
नवरात्रीच्या निमित्ताने ९ दिवस स्थापित केलेल्या देवीच्या मूर्तीसमोर जागरण करण्यात येते. भजन, पुजन व विविध प्रकारचे प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. येत्या २९ सप्टेंबरपासुन मातेची घटस्थापना होणार असुन त्यानिमित्ताने देवी देवतांच्या मंदिराच्या रंगरंगोटीच्या कामाला सुरुवात झाली आहे. तर मूर्तीकारही आता दुर्गामातेच्या मूर्ती साकारण्यात व्यस्त झाले आहे. मूर्तीकारही घेतलेल्या मूर्ती तयार करण्यासाठी मूर्तीवर अखेरचा हात फिरवताना दिसत आहे.
हेही वाचा - गोंदियातील शेतकरी अजुनही पीक विम्यापासून वंचित
कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसाय लुप्त होत आहे. येणारी पिढी याकडे लक्ष देत नाही. या कामामध्ये श्रम जास्त लागतात. मात्र उत्पन जितके मिळायला पाहिजे तितके मिळत नसल्याने नवीव पिढी याक लेकडे दुर्लक्ष करत दुसऱ्या कामाकडे वळत आहे, असे कुंभारसमाजाचे म्हणणे आहे.