ETV Bharat / state

गोंदियात पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येने खळबळ

ओमप्रकाश रहिले हे देवरी येथील वॉर्ड क्रमांक ५ मधील शिक्षक कॉलनीत भाड्याने घर घेऊन राहतात. ते नक्षल ऑपरेशनच्या स्पेशल अॅक्शन फोर्समध्ये कार्यरत होते. त्यांचे हे पथक 'सी ६०' म्हणून संबोधले जात असून पोलीस महानिरीक्षकांच्या मार्गदर्शनात ते काम करते.

policeman in Gondia Suicide
गोंदीयात पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येने खळबळ
author img

By

Published : Mar 14, 2020, 4:08 PM IST

गोंदिया- देवरी पोलीस ठाण्यांतर्गत कार्यरत पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ओमप्रकाश रहिले (वय २८, रा. मोरगाव-अर्जुनी) यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे.

ओमप्रकाश रहिले हे देवरी येथील वॉर्ड क्रमांक ५ मधील शिक्षक कॉलनीत भाड्याने घर घेऊन राहतात. ते नक्षल ऑपरेशनच्या स्पेशल अॅक्शन फोर्समध्ये कार्यरत होते. त्यांचे हे पथक 'सी ६०' म्हणून संबोधले जात असून पोलीस महानिरीक्षकांच्या मार्गदर्शनात ते काम करते.

ओमप्रकाश २०११ मध्ये पोलीस दलात भर्ती झाले होते. ते गेल्या २ वर्षांपासून या पथकामध्ये कार्यरत आहे. पोलीस विभागातील कामाचा ताण आणि वरिष्ठांच्या दबावामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी चर्चा सुरु आहे. त्यांचा काही दिवसापूर्वीच साक्षगंधही झाला आहे. रहिले यांच्या आत्महत्येमुळे पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.