गोंदिया - बल्लारसा रेल्वेगाडीने चंद्रपूर जिल्ह्यात देशी दारूची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला गोंदिया रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव दिनेश गोन्नाडे (33)असून तो चंद्रपूर येथील रहिवासी आहे. आरोपीकडून 96 देशी दारुच्या बॉटल जप्त करण्यात आल्या आहे.
हेही वाचा... अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळामध्ये भ्रष्टाचार झाला.. रोहित पवारांची चौकशीची मागणी
रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना पेट्रोलिंग करत असताना अर्जुनी-मोरगाव रेल्वे स्टेशनवर आरोपी दिनेश हा मोठी बॅग घेऊन रेल्वे गाडीत बसताना दिसला. त्याच्यावर संशय आल्यावर त्याला रेल्वे पोलिसांनी विचारपूस केली. त्यावेळी आरोपीने उडवाउडवीची उत्तर दिली. यानंतर त्याची बॅग तपासली असता त्यामध्ये दोन मोठ्या बॉक्समध्ये 96 बॉटल देशी दारू आढळली. याबाबत विचारणा केली असता मोरगाव-अर्जुनीवरुन कमी दरात दारू विकत घेऊन दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात नेत असल्याची कबूली त्याने दिली. यानंतर पोलिसांनी दिनेशला अटक करत त्याच्यावर रेल्वे कायद्यानुसार गुन्हा नोंदवला. तसेच देशी दारूसह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
हेही वाचा... वन कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाळू तस्करांनी घातला ट्रॅक्टर; पाच जणांना अटक