गोंदिया - मलेरिया आणि डेंग्यू या आजाराचे रुग्ण गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, ह्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळत असतात. त्यामुळे हे जिल्हे अतिसंवेदनशील म्हणून ओळखले जातात. जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात डेंग्यू मलेरियाचा संसर्ग अधिक वाढतो. या महिन्यात मलेरिया विभागाकडून रक्त तपासणी करून मलेरिया आणि डेंग्यूचे संरक्षण केले जाते. परंतू, मार्च महिन्यापासुन कोविड-१९ चा संसर्ग वाढल्याने आरोग्य विभाग आणि हिवताप विभागाचे जास्तीत जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोविड-१९ च्या सर्वेची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे मलेरिया आणि डेंग्यूचा सर्वे मागेच राहिला. याच कारणामुळे मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दुपट्टीने वाढ झाल्याचे हिवताप विभागाने सांगितले आहे.
मागील वर्षी याच काळात ५७ मलेरिया पॉझिटिव्ह रुग्ण आढळेल होते. मात्र, डेंग्यूचे रुग्ण मिळाले नव्हते. तर याच कालावधीत यावर्षी रुग संख्येत दुपट्टीने वाढ होऊन मलेरियाच्या संख्येत १०२ वर संख्या पोहोचली आहे. यामध्ये एक डेंग्यूच्या रुग्णाचा समावेश असुन दोन रुग्ण डेंगू संशयित असल्याची माहिती दिली आहे. रुग्ण वाढण्याचे दुसरे कारण हे ही सांगण्यात येत आहे की, हिवताप विभागात गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त पदे भरल्या गेले नाहीत. त्यामुळे सर्वे करताना कर्मचाऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष असे की, हिवताप विभागाकडून जिल्ह्यात कसल्याच प्रकारची मलेरिया, डेंग्यी संदर्भात फवारणी करण्यात आली नसल्याची बाब समोर आलेली आहे.
हेही वाचा - कांगारु, माकडे, कासव अन् पोपटांची तस्करांच्या तावडीतून सुटका; परदेशातून भारतात तस्करी
संपूर्ण देश कोरोना संसर्ग आजाराने ग्रासलेला आहे. शासनाकडून युद्ध स्तरावर कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना सुरु आहेत. मार्च महिन्यापासून आरोग्य विभागापासून तर शिक्षकांना ही या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक बाबतीत कामी लावण्यात आले आहे. यात सर्वेचेही काम आहे. अशातच जून ते ऑगस्ट महिन्यात मलेरिया व डेंग्यू या आजाराचे रुग्ण झपाट्याने वाढत असतात. मलेरिया व डेंग्यूवर आळा घालण्यासाठी प्रत्येक वर्षी या तीन महिन्यात आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा सेविकांच्या मदतीने प्रत्येक नागरिकांचे रक्त तपासण्या करून घेतात.
गेल्या वर्षी जानेवारी ते जुलै महिन्यापर्यंत दोन लाखाहून अधिक रक्त तपासण्या करून घेतल्या होत्या. या रक्त तपासण्यांमध्ये ५७ रुग्ण मलेरिया पॉझिटिव्ह आढळून आले होते. मात्र, या वर्षी कोविड-१९ च्या सर्वे मुळे मलेरिया व डेंग्यूचा सर्वे मागे पडला. म्हणजेच या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० टक्केच रक्त नमुने घेण्यात आले. १ लाख ८१ हजार ६३८ रक्त नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यामध्ये तब्बल १०२ रुग्ण मलेरिया पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर यामध्ये डेंग्यूचाृ्या १ रुग्णाचा समावेश आहे.
सदर आकडे पाहून हे स्पष्ट होत आहे की, यावर्षी रक्त नमुन्यांची चाचणी ५० टक्के पेक्षा कमी झाली आहे. जर गेल्या वर्षी च्या तुलनेत या वर्षी हि दोन लाखाच्या वर नमुन्याची चाचणी घेण्यात आली असती, तर कदाचित रुग्ण संख्यामध्ये कमालीची वाढ दिसून आली असती. या विषयवार हिवताप विभागाकडून माहिती देण्यात आली की, कोविड १९ च्या सर्व्हेत ८० टक्केपेक्षा अधिक कर्मचारी गुंतलेले आहेत. तर १८८ पद निर्मिती मधून ८२ पद रिक्त असल्यामुळे मलेरिया आणि डेंग्यू सर्वे प्रभावित झाले आहे.
हेही वाचा - राम मंदिर भूमिपूजन: एकोप्याचा संदेश देत मुस्लिम कुटुंब पेटवणार 501 दिवे
विशेष म्हणजे गोंदिया जिल्हा हा मलेरिया आजाराबाबत अतिसंवेदनशील यादीत समाविष्ट आहे. जिल्ह्यातील सालेकसा, आमगाव, देवरी, सडक-अर्जुनी आणि अर्जुनी-मोरगाव हे आदिवासी बहुल तालुक्यात मोडत असल्याने मलेरिया आणि डेंग्यूचा संसर्ग या भागात अधिक असतो.