ETV Bharat / state

रेल्वेची परीक्षा द्यायची की एमपीएससीची, एकाच दिवशी दोनही परीक्षा - रेल्वेची परीक्षा द्यायची की एमपीएससीची

रेल्वेची परीक्षा सुद्धा 21 मार्चलाच होणार आहे. यामुळे दोन्ही परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना यापैकी कोणत्यातरी एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. सरकारने कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता केवळ दबावापोटी निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसानच केले आहे, असा आरोप विद्यार्थी करत आहेत.

गोंदिया
गोंदिया
author img

By

Published : Mar 20, 2021, 10:25 PM IST

गोंदिया - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) राज्यसेवा पूर्व परीक्षा 14 मार्च ऐवजी 21 मार्च रोजी होणार आहे. तर रेल्वेची परीक्षा सुद्धा 21 मार्चलाच होणार आहे. यामुळे दोन्ही परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना यापैकी कोणत्यातरी एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. सरकारने कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता केवळ दबावापोटी निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसानच केले आहे, असा आरोप विद्यार्थी करत आहेत.

गोंदिया

रेल्वेची परीक्षा 32 हजार 208 जागांसासाठीची परीक्षा याआधीच जाहीर झाली आहे. ही परीक्षा ऑनलाईन होणार असून चार टप्प्यांत होणार आहे. या परीक्षेचा पहिला टप्पा जानेवारीत पार पडला. तर दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा 21 मार्च रोजी होणार आहे. एमपीएससीची परीक्षा देणारे अनेक विद्यार्थी या परीक्षेचा अभ्यास करतात. एमपीएससीसोबत इतर स्पर्धा परीक्षेची तयारी देखील करतात. तसेच या परीक्षांमध्ये यशस्वी होणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. दोन्ही परीक्षा सोबत आल्याने एक संधी वाया जाणार आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाचे कारण देत अवघ्या तीन दिवसांवर येवून ठेपलेल्या 14 मार्चला होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससीने जाहीर केला होता. यावर राज्यभरात विद्यार्थ्यांचा उद्रेक उफाळून आला. याची दखल थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घ्यावी लागली होती. दुसऱ्या दिवशीच तारीख जाहीर केली जाईल, असे सांगण्यात आले. त्यानुसार 21 मार्चला परीक्षा होणार असल्याचे जाहीर केले. मात्र, याचा फटका एमपीएससीसह रेल्वेची परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना बसणार आहे. यावर विद्यार्थ्यांनी नाराजी दर्शविली आहे.

राजकीय गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे नेहमीच नुकसान होते. तारीख जाहीर करून मोकळे झाले. मात्र, याचे काय परिणाम होणार याची दखल देखील सरकारला घ्यावीशी वाटली नाही. कोरोना काळातही अभ्यास सुरू ठेवला आहे, एक संधी वाया जात आहे. केंद्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांचे वेळापत्रक पाळले जाते. याचा आदर्श राज्याने घेतला तर बरेच प्रश्न सोपे होतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.