ETV Bharat / state

कोरोना हरला, गोंदिया जिंकला; आज शेवटचा रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला.. - गोंदिया कोरोना रुग्ण

कोरोना विषाणूचा संसर्ग देशात पसरत असताना जिल्हा प्रशासनाने वेळीच सावध होऊन जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणांना सोबत घेऊन सूक्ष्म नियोजन केले. उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. याला सर्व नागरीक आणि लोकप्रतिनिधींची साथ मिळाली. त्यामुळेच आज जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचे चित्र दिसत आहे.

Gondia district corona update
कोरोना हरला, गोंदिया जिंकला; आज शेवटचा रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला..
author img

By

Published : Jun 11, 2020, 2:10 AM IST

गोंदिया : संपूर्ण जगामध्ये थैमान घातलेल्या कोरोनाला हरवण्यात गोंदिया जिल्ह्याला यश मिळाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले सर्व ६९ कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. बुधवारी अर्जुनी/मोरगावमध्ये असणाऱ्या जिल्ह्यातील शेवटच्या कोरोना रुग्णाला डिस्चार्ज मिळाला, आणि कोरोना हरला.

कोरोना विषाणूचा संसर्ग देशात पसरत असताना जिल्हा प्रशासनाने वेळीच सावध होऊन जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणांना सोबत घेऊन सूक्ष्म नियोजन केले. उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. याला सर्व नागरीक आणि लोकप्रतिनिधींची साथ मिळाली. त्यामुळेच आज जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचे चित्र दिसत आहे.

कोरोना हरला, गोंदिया जिंकला; आज शेवटचा रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला..

कोरोनामुक्तीसाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी नागरिकांची साथ तर मिळालीच, सोबत आरोग्य विभागाने सर्व कोरोना बाधित रुग्णांवर काळजीपूर्वक उपचार देखील केले.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचतगटांनी कोविड केअर सेंटर येथे उपचार घेत असलेल्या सर्व रुग्णांना सकस आणि पोटभर जेवण दोन्ही वेळ दिले. त्यामुळे रुग्ण लवकर बरे होण्यास मदत झाली. रुग्णांनी देखील या आहाराबाबत समाधान व्यक्त केले.

जिल्ह्यात २६ मार्चला पहिला कोरोना रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर १९ मे रोजी दोन रुग्ण आढळून आले. २१ मे रोजी सर्वाधिक २७ रुग्ण आढळून आले. त्यानंतर २२ मे रोजी १०, २४ आणि २५ मे रोजी प्रत्येकी चार रुग्ण, २६ आणि २७ मे रोजी प्रत्येकी एक रुग्ण, २८ मे रोजी नऊ रुग्ण, २९ मे रोजी तीन रुग्ण, ३० मे रोजी चार रुग्ण, ३१ मे रोजी एक रुग्ण आणि दोन जूनला दोन रुग्ण आढळून आले. या ६९ रुग्णांनंतर दोन जून ते दहा जून यादरम्यान जिल्ह्यात एकाही नव्य रुग्णाची नोंद झाली नाही.

जिल्ह्यातील 1,129 व्यक्तींचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. यांपैकी ६९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, त्या सर्वांवरील उपचार यशस्वी झाले आहेत. २२ जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. तसेच, विविध शाळा व संस्थांमध्ये 1,574 आणि घरी 1,743 असे एकूण 3,317 व्यक्ती विलगीकरणात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे यांनी दिली.

हेही वाचा : बेपत्ता कोरोनाबाधित महिला मृत्यू प्रकरण : वॉर्ड क्रमांक सातमधील सर्व कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.