ETV Bharat / state

बिबट्याच्या हल्ल्यात 5 शेळ्या आणि 1 बोकड मृत्यूमुखी; शेतकऱ्यांचे 70 हजारांचे नुकसान

केळवद या गावातील एका शेतकऱ्याच्या गोठ्यात बांधलेल्या पाच शेळ्या व एक बोकड मध्यरात्री बिबट्याने हल्ला केल्याने मृत्यूमुखी पडल्याची घटना सकाळी उघडकीस आली. या घटनेत शेतकऱ्याचे ७० हजाराचे नुकसान झाले. मागील काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा सुरु आहे.

author img

By

Published : Aug 5, 2019, 4:41 PM IST

बिबट्याचा हल्ल्यात 5 शेळ्या आणि 1 बोकड ठार झाले

गोंदिया- जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केळवद येथील शेतकरी केवळराम वालदे यांच्या गोठ्यात बांधलेल्या पाच शेळ्या व एक बोकड यांच्यावर मध्यरात्री बिबट्याने हल्ला केल्याने मृत्यूमुखी पडल्या. सकाळी-सकाळी जेव्हा केवळराम वालदे उठल्यावर शेळ्या सोडण्यासाठी गोठ्याकडे गेले असता हा प्रकार उघडकीस आला. हे दृश्य पाहून तो वालदे यांना धक्का बसला.

बिबट्याचा हल्ल्यात 5 शेळ्या आणि 1 बोकड ठार झाले

शेती व मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबावर या घटनेने मोठे संकट निर्माण झाले आहे. वालदे यांचे जवळपास 70 हजारांचे नुकसान झाले आहे. वनविभागाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी घटनास्थळी कर्मचाऱयांना घटनास्थळावर जाऊन पंचनामा करून अहवाल सादर करण्यास सांगितले. यापूर्वी अनेकदा या परिसरातील लोकांच्या घरात बिबट्या शिरल्याची घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी शासकीय आश्रम शाळा, इळदा येथील आवार भिंतीवर बिबट्या बसुन असल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली होती. मात्र काहीच कारवाई झाली नसल्याचे नागरिकांनी संताप व्यक्त केला. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 05-08-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- mh_gon_05.aug.19_leopard attack_7204243
बिबट्याने सहा शेळ्या केल्या फस्त
शेतकर्यांचे 70 हजाराचे नुकसान
Anchor :- केळवद या गावातील एका शेतकऱ्याच्या बाजूला गोठ्यात बांधलेल्या पाच शेळ्या व एक बोकड बकरा मध्य रात्री बिबट्याने फास्ट केल्याची घटना सकाळी उघडकीस आली असता या शेतकऱ्याचे ७० हजाराचे नुकसान झाले असून मागील काही दिवसा पासून या परिसरात बिबट वावरत असल्याचे हि चर्चा आहे.
VO :- गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केळवद येथील शेतकरी केवळराम वालदे यांच्या गोठ्यात बांधलेल्या पाच शेळ्या व एक बोकड (बकरा) ला मध्यरात्री बिबट्याने मारून फस्त केल्याची घटना घडली. सकाळी-सकाळी जेव्हा केवळराम उठल्यावर बकऱ्या सोडण्यासाठी गोठ्या कडे गेला असता तेव्हा ते दृश्य पाहून तो शेतकरी शॉक झाला. शेती व मोल मंजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंब प्रमुखावर या घटनेने मोठा संकट निर्माण झाला आहे. केवळराम यांचे जवळपास 70 हजाराचा नुकसान झाले आहे. वनविभागाने ही नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी नि घटनास्थळी दाखल होऊन सहकाऱ्यांना पंचनामा करून अहवाल मागितला. यापूर्वी अनेक दा या परिसरातील लोकांच्या घरात हि बिबट्या शिरल्याची घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी शासकीय आश्रम शाळा, इळदा येथील आवार भिंतीवर बिबट्या बसुन असल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली होती. मात्र काहीच कारवाई झाली नसल्याचे नागरिकांची ओरड आहे. सदर बिबट्या चा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी करत आहेत. Body:VO :-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.