ETV Bharat / state

जिल्हा दुष्काळग्रस्त करून शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजाराची मदत करा - नाना पटोले - ईव्हीएम

पावसाअभावी परे सुकली आहेत. म्हणून शासनाने क्षणाचाही विलंब न लावता धान उत्पादक शेतक-यांना प्रति एकरी २५०० रूपये नुकसानभरपाई द्यावी अन्यथा तीवर आंदोलन करत रस्त्यावर उतरू, अशी मागणी अखिल भारतीय किसान काँग्रेसचे माजी अध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी केले आहे.

पत्रकारांसोबत संवाद साधताना माजी खासदार नाना पटोले
author img

By

Published : Jul 23, 2019, 1:04 PM IST

Updated : Jul 23, 2019, 2:43 PM IST

गोंदिया - पावसाने दांडी मारल्यामुळे जिल्ह्यात भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी परे सुकली आहेत. म्हणून शासनाने क्षणाचाही विलंब न लावता धान उत्पादक शेतक-यांना प्रति एकरी २५०० रूपये नुकसानभरपाई द्यावी अन्यथा तीवर आंदोलन करत रस्त्यावर उतरू, अशी मागणी अखिल भारतीय किसान काँग्रेसचे माजी अध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी केले आहे.

जिल्हा दुष्काळग्रस्त करून शेतक-यांना हेक्टरी २५ हजाराची मदत करा - नाना पटोले

गेल्या १५ दिवसांपासून पूर्व विदर्भात पावसाने दांडी मारल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्थिती बिकट बनली आहे. धानाचे कोठार म्हणून संबोधण्यात येणाऱ्या जिल्ह्यात पाण्याअभावी धान्याचे पीक करपायला लागले आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात पाऊस बरसला नाही तर या ठिकाणी स्थिती अजूनच बिकट होणार आहे.

पटोले यांनी राज्य सरकारवर आरोप करत म्हटले आहे की, राज्यातील भाजप-सेना सरकारतर्फे शेतकऱयांसाठी सुरू करण्यात आलेली कर्जमाफी योजना फसवी ठरल्याने शासनाने संपुर्ण कर्जमाफी घोषणा करावी. राज्यातील फडणवीस व केंद्रातील मोदी सरकार शेतकरी विरोधी असून शेतकऱयांच्या हिताला मुठमाती देण्याचे काम सरकार करीत असुन मागील ५ वर्षात शेतकऱयांच्या हिताचे घेतलेल्या निर्णय त्यांनी जाहीर करावेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत ईव्हीएम मशीन सेट करून भाजपचे खासदार निवडून आले आहेत. आगामी सर्व निवडणुका बॅलेट पेपरने व्हाव्यात, यासाठी ९ ऑगस्ट पासून संपुर्ण देशात 'ईव्हीएम हटाव, लोकतंत्र बचाव' ही मोहिम काँग्रेसच्या वतीने सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 23-07-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- MH_GON_23.JULY.19_DUSHKAL_7204243
जिल्हा दुष्काळग्रस्त करून शेतक-यांना हेक्टरी २५ हजाराची मदत करा अन्यथा रस्त्यावर उतरू - नाना पटोले
Anchor :- गेल्या १५ दिवसापासून पूर्व विदर्भात पावसाने दांडी मारली असून गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्थिती बिकट बनली आहे धानाचे कोठार मंहून संबोधण्यात येणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात पाण्याअभावी धानाचे पीक करपायला लागले आहे त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात पाऊस बरसला नाही तर या ठिकाणी स्थिती अजूनच बिकट होणार आहे आज गोंदिया जिल्ह्याचा विचार केला असता या ठिकाणी तब्बल १३३० मिलीमीटर इतका पाऊस पडत असतो मात्र आतापर्यंत सरासरीपेक्षा गोंदिया जिल्ह्यात ३२ टक्के इतका पाऊस पडला आहे त्यामुळे मागील वर्षीचा तुलनेत आतापर्यंत पावसाची कमतरता पाहता त्याचा फटका कोरडवाहू शेतकऱ्यांना बसत आहे.
VO :- गोंदिया जिल्ह्यात पावसाने दांडी मारल्यामुळे संपुर्ण गोंदिया जिल्ह्यात भयानक परिस्थिती आहे. पावसा अभावी परे सुकले आहेत. शासनाने क्षणाचाही विलंब न लावता तसचे धान उत्पादक शेतक-यांना प्रति एकरी २५०० रूपये नुकसानभरपाई त्वरीत द्यावा अशी मागणी अखिल भारतीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महा प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रचार प्रमुख व माजी खासदार नानाभाउ पटोले यांनी केले आहे. अन्यथा तीवर आंदोलन करत रस्त्यावर उतरू
VO :- नान पटोले यांनी आरोप लावला की, राज्यातील भाजप सेना सरकारतर्फे शेतक-यांसाठी सुरू करण्यात आलेली कर्जमाफी योजना शेतक-यांसाठी फसवी ठरल्याने शासनाने संपुर्ण कर्जमाफी घोषणा करावी, राज्यातील फडणवीस व केंद्रातील मोदी सरकार शेतकरी विरोधी असुन शेतक-यांच्या हिताला मुठमाती देण्याचे काम सरकार करीत असुन मागील ५ वर्षात शेतक-यांच्या हिताचे कुठले निर्णय घेतले यांची त्यांनी जाहिर वाचत्या करावी फक्त खोटी आश्वासने देवुन सत्ता काबीज करणारे नेते आजही जनतेला भुलथापा देत आहेत. दरवर्षी राज्यातील ५ लाख तरूणांना रोजगार देवु म्हणणारे सत्तारूढ भाजप सेना सरकार लोकांच्या नोक-या हिरावुन घेत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन सेट करून भाजपचे खासदार आले आहेत. आगामी सर्व निवडणुका बॅलेट पेपरने व्हाव्यात यासाठी ९ ऑगस्ट पासुन संपुर्ण देशात ईव्हीएम हटाव व लोकतंत्र बचाव ही मोहिम काँग्रेसच्या वतीने सुरू करण्यात येईल
BYTE:- नाना पटोले (माजी खासदार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रचार प्रमुख)Body:VO :- Conclusion:
Last Updated : Jul 23, 2019, 2:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.