ETV Bharat / state

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे सासरे अनंतात विलीन - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री चौहान यांच्या सासऱ्यांचा मृत्यू

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे सासरे आणि गोंदियाचे प्रतिष्ठीत व्यापारी तसेच सामाजिक कार्यकर्ते घनश्यामदास मसानी यांचे बुधवारी हृदयविकाराने निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर आज (गुरुवारी) गोंदिया येथील मोक्षधाम येथे अंत्यसस्कार पार पडले.

शिवराजसिंह चौहान यांचे सासरे अनंतात विलीन

author img

By

Published : Nov 19, 2020, 8:49 PM IST

Updated : Nov 19, 2020, 9:35 PM IST

गोंदिया - मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे सासरे आणि गोंदियाचे प्रतिष्ठीत व्यापारी तसेच सामाजिक कार्यकर्ते घनश्यामदास मसानी यांचे बुधवारी हृदयविकाराने निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर आज (गुरुवारी) गोंदिया येथील मोक्षधाम येथे अंत्यसस्कार पार पडले. यावेळी त्यांचे जावई आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे देखील उपस्थित होते.

शिवराजसिंह चौहान यांचे सासरे अनंतात विलीन
शिवराजसिंह चौहान यांचे सासरे अनंतात विलीन

घनश्यामदा मसानी यांचे बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता भोपाल येथे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या निवास्थानी निधन झाले. ते ८८ वर्षाचे होते. त्यानंतर आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास एयर अॅम्बुलन्सने त्यांचे पार्थिव गोंदिया येथील बिरसी विमानतळावर आण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, त्यांची पत्नी साधना सिंह आणि अन्य कुटुंबीय देखील होते. गोंदिया येथे पोहोचल्यावर त्यांचा पार्थिवदेह अंतिम दर्शनासाठी गोरेलाल चौक येथील त्यांच्या निवास्थानी ठेवण्यात आला होता. यावेळी गोंदियाचे माजी आमदार हरिहरभाई पटेल, गोपालदास अग्रवाल, भाजपाचे सुनील केलनका, भरत क्षत्रीय, अशोक चौधरी तसेच इतर मान्यवरांनी श्रध्दांजली अर्पण केली.

आज दुपारी ३ वाजता धार्मीक विधी उरकल्यानंतर सुरू झालेली मसानी यांची अंत्ययात्रा गोरेलाल चौकातुन गांधी पुतळा मार्गे होत मोक्षधाममध्ये दाखल झाली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच यावेळी कोरोनाच्या दृष्टीने सामाजिक अंतर राखण्यात येत होते.

मुलांसोबत मुलींनीही दिला मुखाग्नी-

स्वर्गीय घनश्यामदास मसानी यांच्या पार्थिव शरीराला त्यांचा मुलगा अमरसिंग, संजयसिंग सोबत त्यांच्या ३ मुली साधनासिंह, कल्पनासिंह आणि रेखा ठाकुर यांनीही मुखाग्नी दिला.

शिवराज सिंह यांनी व्यक्त केल्या भावना-

या अंत्यविधीनंतर चौव्हान यांच्या उपस्थितीत शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शोक व्यक्त करताना चव्हाण म्हणाले, की मध्यप्रेदश सरकारमध्ये मी मुख्यमंत्री असुनही माझे सासरे घनश्यामदासजी यांनी मला कधीही व्यक्तीगत कामासाठी आग्रह केला नाही. ते नेहमी आनंदी राहणारे आणि शांत स्वभावाचे व्यक्ती होते. त्याच्या वागण्यातून मला नेहमीच प्रेरणा मिळाली आहे. मात्र ते आज आपल्यातून निघून गेले आहेत.

मी जेव्हा जेव्हा त्यांना भोपाळ यायला सांगितले, ते नक्की येईन, असे म्हणायचे. मात्र, ते गेल्या महिन्यात भोपाळला आले. मला मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी जाण्याची इच्छा होती. त्यामुळे आम्ही दर्शनाला गेलो होतो. मात्र, दर्शनावरून परत येत असताना रस्त्यातच आम्हाला त्यांची प्रकृती खराब झाली असल्याची माहिती मिळाली. त्यांना ज्यावेळी हार्ट अॅटक आला होता. त्यावेळी ते वॉकिंग करत होते. आणि ते ओम नम: शिवाय मंत्राचा जप करत होते, याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.

या शोक सभेला मध्यप्रेदश विधानसभा चे अध्यक्ष रामेश्वर शर्मा, सिवनीचे विधायक दिनेशरॉय मुनमून, गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल, नगराध्यक्ष अशोक इंगोले, मध्यप्रदेशचे माजी खासदार बोधसिंग भगत, बालाघाटचे जिल्हाधिकारी दिपक आर्य, पोलीस महानिरीक्षक व्यंकटेश्वर राव, पोलीस उपमहानिरीक्षक अनुराग शर्मा, पोलीस अधिक्षक अभिषेक तिवारी, मंडलाचे कमांडेंट अभिजीत रंजन इत्यादी अधिकारी उपस्थित होते.

Last Updated : Nov 19, 2020, 9:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.