ETV Bharat / state

गडचिरोली लोकसभा : भाजपचे अशोक नेते याचा विजय, काँग्रेसचे नामदेव उसेंडी यांचा पराभव - rameshkumar gajabe

भाजपचे अशोक नेते यांचा विजय झाला आहे. तर, काँग्रेसचे नामदेव उसेंडी यांचा पराभव झाला.

अशोक नेते, रमेशकुमार गजबे आणि नामदेव उसेंडी
author img

By

Published : May 23, 2019, 6:09 AM IST

Updated : May 23, 2019, 8:33 PM IST

गडचिरोली - गडचिरोली-चिमुर मतदारसंघात नक्षलवाद्यांच्या जाचाला कंटाळलेले आदिवासी कोणाला पुढारी बनवणार? हे आज स्पष्ट होणार आहे. यासाठी थोड्याचवेळात शहरातील कृषी महाविद्यालयात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या मतदारसंघातून भाजपकडून अशोक नेते रिंगणात होते. त्यांनी काँग्रेसच्या नामदेव उसेंडी यांचे आव्हान होते. शिवाय या दोन्ही उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमेशकुमार गजबे यांचेही आव्हान होते. मात्र, आता यापैकी कोण नक्षलग्रस्तांचे प्रश्न संसदेत मांडणार, हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

LIVE UPDATES -

  • सा.७.५० वा - भाजपचे अशोक नेते यांचा विजय झाला आहे. त्यांनी काँग्रेसचे उसेंडी यांचा पराभव केला.
  • दु. ३.३३ वा. - अशोक नेते ६६ हजार ५२६ मतांनी आघाडीवर
  • दु. २.५० वा - नववी फेरी पूर्ण, अशोक नेते ७० हजार ३० मतांनी आघाडीवर
  • दु. २.२५ वा. - आठवी फेरी पूर्ण, नेते ६५ हजार ४६९ मतांनी आघाडीवर
  • दु. २.१६ वा. - अशोक नेते आठव्या फेरीत ६२ हजार ५२६ मतांनी आघाडीवर
  • दु. १.३८ वा. - अशोक नेते ५३ हजार २६२ मतांनी आघाडीवर
  • दु. १२.५३ वा. - भाजप नेते ५७ हजार मतांनी आघाडीवर
  • स. ११.४५ वा. - चौथ्या फेरीला सुरुवात, अशोक नेते ३० हजार ३६ मतांनी आघाडीवर
  • स. ११.०० वा. - भाजपचे अशोक नेते २० हजार ८७२ मतांनी आघाडीवर
  • स. १०.२२ वा. अशोक नेते १४ हजार ८२ मतांनी आघाडीवर
  • स. १०.१० वा. - अशोक नेते १० हजार ७३० मतांनी आघाडीवर
  • स. ९.५६ वा. - तिसऱ्या फेरीत अशोक नेते ६८८९ मतांनी आघाडीवर
  • स. ९.३२ वा. - भाजपचे अशोक नेते तिसऱ्या ५९३६ मतांनी आघाडीवर
  • स. ९.२३ वा. - भाजपचे उमेदवार अशोक नेते दुसऱ्या फेरीत ४१९८ मतांनी आघाडीवर
  • स. ९.०७ वा. - भाजपचे उमेदवार अशोक नेते आघाडीवर
  • स. ८ वा - मतमोजणीला सुरुवात

गडचिरोली-चिमुर मतदारसंघात गेल्या ११ एप्रिलला मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी काही ठिकाणी नक्षल्यांनी मतदानप्रक्रियेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना पोलिसांनी चोख उत्तर देत मतदान प्रक्रिया अगदी सुरळीतपणे पार पाडण्यात यश मिळवले होते. या मतदारसंघात राज्यभरातील सर्वाधीक मतदान म्हणजे एकूण ७१.९८ टक्के नोंद झाली आहे. नोंदही याच मतदारसंघात झालेली आहे. त्यामुळे मतदानाचा वाढलेला टक्का कोणाला दिल्लीत पाठवणार? हे आज स्पष्ट होणार आहे.

आदिवासी आणि नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली-चिमुर या अतिसंवेदनशील मतदारसंघातील मतदारांच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. याच समस्या सोडवण्याचे आश्वासन देत भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी स्थानिकांची मने जिंकण्याचा प्रयत्न करून ही निवडणूक लढवली होती.

२०१४ मध्येही अशोक नेते आणि नामदेव उसेंडी आमनेसामने -
२००९ ला लोकसभा मतदारसंघाची नव्याने पुनर्रचना झाल्यानंतर गडचिरोली-चिमूर असा नवीन मतदारसंघ तयार झाला. या मतदारसंघातून २००९ला काँग्रेसचे मारोतराव कोवासे यांचा विजय झाला होता. गेल्या २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून अशोक नेते आणि काँग्रेसकडून नामदेव उसेंडी दोघेही समोरासमोर रिंगणात उभे होते. मात्र, त्यावेळी अशोक नेते यांनी बाजी मारली. त्यांनी तब्बल २ लाख ४६ मतांनी उसेंडी यांना पराभूत केले होते. मात्र, यंदा काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या गटबाजीचा फटका डॉ. उसेंडी यांना बसणार? की नेते आपला गढ राखणार? याचा फैसला आज होणार आहे.

Intro:Body:

DUmmy

Conclusion:
Last Updated : May 23, 2019, 8:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.