ETV Bharat / state

पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत गडचिरोली पोलीस दलातर्फे हुतात्मा जवानांना मानवंदना - Gadchiroli Police incident

चकमकीत वीरमरण आलेल्या जवानांना पोलीस कवायत मैदानावर रविवारी सायंकाळी उशिरा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सशस्त्र पोलीस दलातर्फे बंदुकीच्या हवेत फैरी झाडून सलामी देण्यात आली.

मानवंदना
मानवंदना
author img

By

Published : May 17, 2020, 11:23 PM IST

गडचिरोली - भामरागड तालुक्यातील जंगलात झालेल्या चकमकीत वीरमरण आलेल्या जवानांना पोलीस कवायत मैदानावर रविवारी सायंकाळी उशिरा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सशस्त्र पोलीस दलातर्फे बंदुकीच्या हवेत फैरी झाडून सलामी देण्यात आली. पोलीस दलातर्फे संपूर्ण शासकीय प्रथेनुसार हुतात्मा पोलीस जवानांना भावपूर्ण मानवंदना दिली.

मानवंदना

यावेळी पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैसस्वाल, अपर पोलीस महासंचालक विशेष अभियान राजेंदर सिंग, विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, पोलीस उपमहानिरीक्षक महादेव तांबडे, जिल्हाधिकारी दीपक सिंगला व पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी या घटनेत मृत पावलेल्या हुतात्मा पोलिसांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले व श्रद्धांजली वाहिली.

यावेळी वीरमरण आलेला जवान आत्राम यांचे कुटुंबीय उपस्थित होते. पोलीस महासंचालक, अपर पोलीस महासंचालक यांनी यावेळी हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला व त्यांचे सांत्वन केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.