ETV Bharat / state

गडचिरोलीत घटनास्थळावर सापडले AK-४७ चे भरलेले २ मॅगझीन - jawan

दादापूर येथे नक्षलवाद्यांनी गुरुवारी लावलेले बॅनर आजही जैसे थे आहेत.

घटनास्थळ
author img

By

Published : May 3, 2019, 1:34 PM IST

गडचिरोली - महाराष्ट्र दिनी नक्षल्यांनी कुरखेडा-कोरची मार्गावरील लेंढारी नाल्यावर भूसुरुंग स्फोट घडवून आणला. या स्फोटात १५ पोलीस जवानांना वीरमरण आले. तर, एक खासगी चालकाचाही मृत्यू झाला. या घटनेच्या तिसऱ्या दिवशीही या परिसरात पोलिसांकडून शोध मोहीम सुरू आहे. शुक्रवारी सकाळी घटनास्थळी AK-४७ बंदुकीचे भरलेले २ मॅगझीन या परिसरात आढळून आले.

दुसरीकडे दादापूर येथे नक्षलवाद्यांनी गुरुवारी लावलेले बॅनर आजही जैसे थे आहेत. महाराष्ट्र दिनाच्या पहाटे पुराडा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील दादापूर येथे नक्षल्यांनी २७ वाहनांची जाळपोळ केली होती. या घटनेची चौकशी करण्यासाठी कुरखेडा येथील विशेष कृती दलाचे जवान खासगी वाहनाने जात असताना लेंढारी नाल्यावर नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. यात १५ जवान व एका खासगी वाहन चालकाला वीरमरण आले. या घटनेनंतर २ दिवसापासून कुरखेडा-कोरची मार्ग बंद आहे. आज तिसऱ्या दिवशी हा मार्ग सुरू झाला असला तरी रस्त्यावरील भूसुरुंग स्फोटाचा खड्डा जैसे थे असल्याने चारचाकी वाहनांना मार्ग बंद आहे. तर केवळ दुचाकी या मार्गाने जात आहे.

गडचिरोलीत घटनास्थळावर सापडले AK-४७ चे भरलेले २ मॅगझीन

दुसरीकडे भूसुरुंग स्फोट घडवून आणल्यानंतर त्याच रात्री पुन्हा नक्षलवाद्यांनी दादापूर येथे वीस ते पंचवीसच्या संख्येने नक्षली बॅनर लावले. हे बॅनर आजही गावात जैसे थे आहेत. या घटनेची चौकशी केली जात असून घटनेला जबाबदार कोण? दोषींवर नक्कीच कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री व पोलीस महासंचालकांनी मानवंदना कार्यक्रमात स्पष्ट केले होते. त्यामुळे खासगी वाहनाने पोलीस जवानांना पाठवणारे कुरखेडा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.

Intro:Gadchiroli naxal attack : घटनास्थळावर सापडले AK-47 चे भरलेले दोन मॅगझीन, दादापूर येथील नक्षलीे बॅनर आजही जैसे थे

गडचिरोली : महाराष्ट्र दिनी नक्षल्यांनी कुरखेडा-कोरची मार्गावरील लेंढारी नाल्यावर भूसुरुंग स्फोट घडवून आणला . या स्फोटात पंधरा पोलीस जवानांना वीरमरण आले. घटनेच्या तिसऱ्या दिवशीही या परिसरात पोलिसांकडून सर्चींग ऑपरेशन सुरू असून शुक्रवारी सकाळी घटनास्थळी AK-47 बंदुकीचे भरलेले दोन मॅगझीन आढळून आले. तर दुसरीकडे दादापूर येथे नक्षलवाद्यांनी काल लावलेले बॅनर आजही जैसे थे आहेत. Body:महाराष्ट्र दिनाच्या पहाटे पुराडा पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील दादापूर येथे नक्षल्यांनी 27 वाहनांची जाळपोळ केली होती. या घटनेची चौकशी करण्यासाठी कुरखेडा येथील विशेष कृती दलाचे जवान खाजगी वाहनाने जात असताना लेंढारी नाल्यावर नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. यात 15 जवान व एका खाजगी वाहन चालकाला वीरमरण आले. या घटनेनंतर दोन दिवसापासून कुरखेडा-कोरची मार्ग बंद आहे. आज तिसऱ्या दिवशी हा मार्ग सुरू झाला असला तरी रस्त्यावरील भूसुरुंग स्फोटाचा खड्डा जैसे थे असल्याने चारचाकी वाहनांना मार्ग बंद आहे. तर केवळ दुचाकी या मार्गाने जात आहे.

दुसरीकडे भूसुरुंगस्फोट घडवून आणल्यानंतर त्याच रात्री पुन्हा नक्षलवाद्यांनी दादापूर येथे वीस ते पंचवीसच्या संख्येने नक्षली बॅनर लावले. हे बॅनर आजही गावात जैसे थे आहेत. या घटनेची चौकशी केली जात असून घटनेला जबाबदार कोण? दोषींवर नक्कीच कारवाई केली जाईल , असे मुख्यमंत्री व पोलीस महासंचालकांनी मानवंदना कार्यक्रमात स्पष्ट केले होते. त्यामुळे खाजगी वाहनाने पोलीस जवानांना पाठवणारे कुरखेडा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. Conclusion:व्हिज्युअल आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.