ETV Bharat / state

गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून माजी उपसरपंचाची हत्या

author img

By

Published : Mar 30, 2020, 1:25 PM IST

नक्षलवाद्यांनी गडचिरोलीतील कोरची तालुक्यातील नवेझरी येथील माजी उपसरपंचाची हत्या केल्याची घटना घडली. रविवारी रात्री काही नक्षली गावात आले होते. त्यांनी हिरालाल यांना गावाबाहेर नेऊन त्यांची हत्या केली. सोमवारी सकाळी गावकऱ्यांना हिरालाल यांचा मृतदेह आढळून आला.

फाईल फोटो
फाईल फोटो

गडचिरोली - पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी रविवारी रात्री कोरची तालुक्यातील नवेझरी येथील एका व्यक्तीची हत्या केली. हिरालाल रामसाय कल्लो (४०), असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते नवेझरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच होते.

रविवारी रात्री काही नक्षली गावात आले होते. त्यांनी हिरालाल यांना गावाबाहेर नेऊन त्यांची हत्या केली. सोमवारी सकाळी गावकऱ्यांना हिरालाल यांचा मृतदेह आढळून आला. नक्षल्यांनी मृतदेहाशेजारी पत्रकही टाकले होते. त्यात हिरालाल हे पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप नक्षल्यांनी केला आहे. हे कृत्य कोरची दलमने केल्याचा अंदाज आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.