गडचिरोली - जिल्ह्यात मागील दहा दिवसांत कोरोनामुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृत्यूसंख्या ३२ वर पोहचली आहे. तसेच आज शनिवारी १०९ जण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहे, तर ८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून मिळालेल्या अहवालानुसार मागील दहा दिवसांत ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवीन ११ मृत्यूमध्ये सिरोंचा २, धानोरा १, आरमोरी तालुक्यातील २, मुरखळा १, गडचिरोली २, अहेरी तालुक्यातील १, तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरातील विद्यानगर येथील १ आणि ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भोसले) येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
नवीन १०९ पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ३१, धानोरा २, आरमोरी २४, देसाईगंज २०, कुरखेडा १, कोरची ७, चामोर्शी ७, अहेरी ८, एटापल्ली ४ आणि सिरोंचा तालुक्यातील ५ जणांचा समावेश आहे, तर आज गडचिरोली तालुक्यातील ४०, अहेरी ५, आरमोरी १०, चामोर्शी २, धानोरा ४, एटापल्ली ४, कोरची १, कुरखेडा ३, सिरोंचा २ आणि देसाईगंज तालुक्यातील १४, असे एकूण ८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत जिल्ह्यात ३८५२ जण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी ३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर २८५० रुग्ण आजारातून बरे झाले आहेत. सध्या ९८१ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ७३.९९ टक्के एवढा आहे.