गडचिरोली - महाराष्ट्र राज्याच्या शेजारी तेलंगाणा राज्यातील मुलुगु जिल्हा ताडवाई मंडल मेडारम येथे बुधवारी (दि. 16 फेब्रुवारी)रोजी सम्मक्का-सारक्का ह्या वन देवतांच्या दर्शनासाठी विविध राज्यातून भक्तांची गर्दी झाली होती. जत्ते बांबूच्या घणारण्यातील मेडारम तेथे पोहचले होते. (Sarakka-Sammakka Jatra) भावीकांच्या उपस्थितीतीने हे ठिकाण दणाणून गेले होते.
येथे कोणतेही मंदिर नाही, मंत्र तंंत्र किंवा काही इतर विधी केले जात नाही. या ठिकाणी एका झाड काली कुंकु भरणी रुपाने असलेल्या सम्मक्का देवी पुजा केली जाते. या ठिकाणी आदीवासींचे सम्मक्का-सारक्का या वन देवतांची पुजा आदीवासी पुजाऱ्यांनी आपल्या पंरपरा नुसार पुज पाट करतात. हे 900 वर्षांपासून आदिवासींचा समुदाय श्रद्धेने दर दोन वर्षानी जत्रा करण्यासाठी मेडारम येथे नियोजन केले जात होते. तेव्हापासून सिद्धबोईना तसेच कोक्केर वंशजांनी सम्मक्का देवीच्या प्रधान पुजारी जबाबदारी घेत हा जत्र केल्या जात आहे.