गडचिरोली - जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा पाहणीदौरा करण्यासाठी केंद्रीय पथक गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाले आहे. या पथकाने शनिवारी (दि. 12 सप्टें.) गडचिरोली तालुक्यातील कनेरी-पारडी या गावातील पूरग्रस्त भागाचा दौरा करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.
मागील आठवड्यात गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे जिल्ह्यात धान आणि कापसाची शेती पाण्याखाली गेली. परिणामी, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. या पथकाने गडचिरोली तालुक्यातील पारडी कनेरी गावापासून पाहणीला सुरुवात झाली आहे.
पथकाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांसोबत पथकाने संवाद साधत माहिती जाणून घेतली. या पथकाकडून दिवसभरात आरमोरी, देसाईगंज तालुक्याचा दौरा केला जाणार आहे. पुरामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे केंद्रीय पथकाच्या या दौऱ्याने शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा वाढली आहे.
हेही वाचा - सर्व्हेक्षण होत राहील आधी पूरग्रस्तांना आर्थिक मदत द्या - फडणवीस