धुळे - कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात आणि जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांच्या मदतीला शहरातील विविध क्षेत्रातील तरुणही धावून आले आहेत. या तरुणांची कोरोना योद्धे म्हणून निवड करण्यात आली आहे.
शहरात पोलिसांच्या मदतीसाठी एकूण ७०० तरुणांची निवड करण्यात आली असून शहराच्या विविध भागात हे तरुण पोलीस बंदोबस्तात कार्यरत आहेत. देशसेवेची आवड आणि पोलिसांवरचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने आम्ही हे काम करीत असल्याची प्रतिक्रिया या तरुणांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली आहे.
हेही वाचा- अपघातातानंतर पॉझिटिव्ह आढळलेला 'तो' तरुण धुळ्याचा नाही