ETV Bharat / state

नवमहाराष्ट्र घडवण्यासाठी शिवसेनेच्या पाठीशी उभे राहा - शुभा राऊळ - माजी महापौर शुभा राऊळ

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या पाठीशी उभे राहून नवमहाराष्ट्र घडवायला हातभार लावायचा आहे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर शुभा राऊळ यांनी केले. त्यांच्या उपस्थितीत शहरात शिवसेनेचा महिला मेळावा पार पडला.

नवमहाराष्ट्र घडवण्यासाठी शिवसेनेच्या पाठीशी उभे राहा ; शुभा राऊळ यांचे महिलांना आवाहन
author img

By

Published : Sep 22, 2019, 5:15 AM IST

धुळे - विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राज्यभरात राजकीय घडामोडींचा वेग वाढला आहे. शहरात शिवसेनेच्या वतीने 'प्रथम ती' या शीर्षकाखाली महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर शुभा राऊळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

नवमहाराष्ट्र घडवण्यासाठी शिवसेनेच्या पाठीशी उभे राहा ; शुभा राऊळ यांचे महिलांना आवाहन

मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेनेने अप्रत्यक्षपणे स्वबळाचा नारा दिला असून, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

निवडणुकांमध्ये इतर राजकीय पक्ष भविष्यात काय करणार आहेत, हे सांगून आश्वासने देतील; मात्र, शिवसेना आम्ही आजपर्यंत काय केले, हे सांगून आपल्यासमोर विकास कामे ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिवसेना हा वर्तमान काळात काम करणारा पक्ष असल्याचे त्यांनी उच्चारले.

यामुळे, येणाऱ्या निवडणुकीत नवमहाराष्ट्र घडवायचा असल्यास शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन शुभा राऊळ यांनी मेळाव्यात केले आहे.

Intro:विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या पाठीशी उभा राहून आपल्याला नवमहाराष्ट्र घडवायचा आहे असं आवाहन करत शिवसेनेच्या उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करण्याचं अप्रत्यक्ष आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर शुभा राऊळ यांनी केलं. शुभा राऊळ यांच्या उपस्थितीत धुळे शहरात महिला मेळावा पार पडला.

Body:विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय रणसंग्रामाचा सुरुवात झाली आहे, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या मेळाव्यांना जोरात सुरुवात झाली असून धुळे शहरात शिवसेनेच्या वतीने "प्रथम ती" या शीर्षकाखाली महिला मेळावा पार पडला. या मेळाव्याला मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर शुभा राऊळ यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेनेने अप्रत्यक्षपणे स्वबळाचा नारा दिला असून विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला विजय करण्याचं अप्रत्यक्ष आवाहन केले जात आहे. विधानसभा निवडणुकीत इतर राजकीय पक्ष भविष्यात आम्ही काय करणार आहोत हे सांगून आपल्याला आश्वासने देतील मात्र शिवसेना आम्ही आजपर्यंत काय केलं हे सांगून आपल्यासमोर विकास काम ठेवतील यामुळे शिवसेना हा वर्तमान काळात काम करणारा पक्ष आहे, यामुळे येणाऱ्या निवडणुकीत नवमहाराष्ट्र घडवायचा असेल तर शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा असं आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर शुभा राऊळ यांनी या मेळाव्यात केलं.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.