धुळे - रमजान ईद निमित्ताने शहरातील पांझरा नदी किनारी असलेल्या इदगाह मैदानावर मुस्लीम बांधवांनी एकत्र येत नमाज अदा केली. यावेळी मुस्लीम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
संपूर्ण देशात रमजान ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मुस्लीम बांधवांनी नमाज अदा करून रमजान ईदचा सण साजरा केला. धुळे शहरातील पांझरा नदी किनारी असलेल्या इदगाह मैदानावर मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केली. यावेळी मुस्लीम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांच्यावतीने गुलाबपुष्प देऊन मुस्लीम बांधवाना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.