पिंपळनेर (धुळे) : पिंपळनेर परिसरात सोयाबीन, वरई अर्थात भगर या शेतमालाची चोरी करणाऱ्या चार जणांच्या टोळीचा धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर पोलिसांनी छडा लावून त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडील मुद्देमालदेखील त्यांनी ताब्यात घेतला आहे. या टोळीकडून साधारणतः ४ लाख २० हजार रुपये किमतीचा ७० क्विंटल माल पोलिसांनी जप्त केलाय. या जप्त केलेल्या मुद्देमालात ६५ क्विंटल सोयाबीन, ५ क्विंटल वरई (भगर) चा समावेश आहे.
गुन्हेगार करीत होता या मालाची चोरी : सोयाबीन, वरई अर्थात भगर या शेतमालाची चोरी करणाऱ्या चार जणांच्या टोळीचा धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर पोलिसांनी छडा लावून त्यांना अटक केली आहे. या टोळीकडून साधारण: ४ लाख २० हजार रुपये किमतीचा ७० क्विंटल माल पोलिसांनी जप्त केलाय. या जप्त केलेल्या मुद्देमालात ६५ क्विंटल सोयाबीन, ५ क्विंटल वरई (भगर ) चा समावेश आहे.
पोलिसांना मिळाली होती माहिती : धुळे जिल्ह्यातील साक्री, पिंपळनेर भागात शेतमाल चोरी होत असल्याची तक्रार पोलीस स्टेशनला करण्यात आली होती. शेतमालाची चोरी करणारे चोर एकांतात असलेल्या गोडावूनमधून, आवारातून शेतमाल चोरी करीत असल्याचे पोलिसांच्या निर्दशनास आलं. तपास सुरू असताना पिंपळनेर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, साक्री तालुक्यातील बोढरीपाडा येथील २६ वर्षीय रणजीत योहान देसाई हा त्याच्या साथीदारांमार्फत सोयाबीन चोरी करीत असल्याची माहिती मिळाली.
गुन्हेगारांची नावे पुढीलप्रमाणे : त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यात बोढरी पाडा येथील ४५ वर्षीय रुवाजी गेंदा गावीत, वार्सा येथील २३ वर्षीय किरण ईश्वर वळवी, साक्री तालुक्यातील नांदरखी येथील २४ वर्षीय दावित वन्या राऊत अशांनी मिळून ही चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी आरोपींना बाजारात विकलेली ६५ क्विंटल सोयाबीन, ५ क्विंटल वरई (भगर) असा एकूण ४ लाख २० हजार रुपये किमतीचा शेतमाल जप्त केला. या टोळीनं धुळे जिल्ह्यात तसेच शेजारच्या जिल्ह्यात आणखी कुठे कुठे चोरी केली याचा तपास पोलीस करीत आहेत. चोरीस गेलेला शेतमाल परत मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. शेतमालाची चोरी होत असल्यानं शेतकऱ्याची चिंता वाढली होती.
हेही वाचा : कोट्यावधींचे केमिकल चोरणारी टोळी दौंड पोलिसांकडून गजाआड