धुळे - मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. त्यामुळे आता केंद्रातील मोदी सरकारने यासाठी प्रयत्न करावेत म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यभरातून एक कोटी पत्रं पाठविण्यात येत आहेत.
मोदींच्या कटआऊटला दिले पत्र
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा शाखेतर्फे शुक्रवारी (18 जून) थेट नरेंद्र मोदींच्या हातातच पत्र देण्यात आले. यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नरेंद्र मोदींचे भव्य कटआऊट उभारले. या कटआऊटमधील मोदींच्या हातात हे पत्र देण्यात आले. त्यामुळे सध्या शहरात याची मोठी चर्चा रंगली आहे.
'एक पत्र मराठा युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी'
'एक पत्र मराठा युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी' या उपक्रमांतर्गत आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. या पत्रात केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रवीकांत वर्पे, सूरज चव्हाण यांच्या संकल्पनेनुसार हा कार्यक्रम सुरू झाला आहे.
हेही वाचा - लॉकडाऊनमधील वेळेचा असाही सदुपयोग, पोफळे कुटुंबाने खोदली अंगणात विहीर