धुळे - जिल्ह्यात १९ जुलै अखेर सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत (१३१.६) टक्के इतके अधिकच पर्जन्यमान झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी एका प्रसिद्धी पत्रद्वारे दिली आहे. या पत्रकात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी नमूद केले आहे की, धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुका वगळता उर्वरित तिन्ही तालुक्यांमध्ये (धुळे, साक्री, शिरपूर)सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले आहे. ( Average Rainfall In Dhule District ) तर मंडळ निहाय पर्जन्यमान पाहता धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील कुडाशी (६२०.२ मिमी), उमरपाटा(५७३.५मिमी) महसूल मंडळात सर्वात जास्त पर्जन्यमान झाले आहे. तर शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा महसूल मंडळात सर्वात कमी म्हणजे १४४.१ मिमी पर्जन्यमान झाल्याची नोंद सरकारी दप्तरी करण्यात आली आहे.
धुळे जिल्ह्यात १९ जुलै अखेर सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत १३१.६ टक्के इतके अधिकच पर्जन्यमान झाले. अशी माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. या पत्रकात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी नमूद केल आहे, की धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुका वगळता उर्वरित तिन्ही तालुक्यांमध्ये (धुळे, साक्री, शिरपूर)सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले आहे. तर मंडळ निहाय पर्जन्यमान पाहता धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील कुडाशी (६२०.२ मिमी), उमरपाटा(५७३.५मिमी) महसूल मंडळात सर्वात जास्त पर्जन्यमान झाले आहे. तर शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा महसूल मंडळात सर्वात कमी म्हणजे १४४.१ मिमी पर्जन्यमान झाल्याची नोंद सरकारी दप्तरी करण्यात आली आहे.
दुष्काळाची झळ - पत्रकात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी जिल्ह्यातील टंचाई स्थितीबाबतच्या स्थिती विषयी नमूद केलेल्या निरीक्षणानुसार धुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये जून महिन्याच्या सरासरी पर्जन्यमानाच्या ५०टक्क्यांपेक्षा अधिकचे पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे तसेच जून महिन्याच्या कालावधीत पर्जन्यातील खंड चार आठवड्यांपेक्षा कमी असल्याचे निरीक्षण सरकारी यंत्रणेने नोंदवले आहे. शासने निर्णय दिनांक ७ ऑक्टोबर 2017 तसेच दिनांक २८जून २०१८ अन्वये दुष्काळाची पहिली कळ (Trigger -1) लागू होत नाही, असे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
२ हजार १८० हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले - धुळे जिल्ह्यात आतापर्यंत ९० टक्के पेरणी झालीय. मात्र, १० ते १२ जुलै दरम्यान धुळे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी, वादळी वाऱ्यासह पावसामुळे झालेल्या नुकसानीचा कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार धुळे जिल्ह्यातील एकट्या साक्री तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच २ हजार १८० हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले.
८५ गावातील ४ हजार २९ शेतकऱ्यांचे नुकसान - कृषी विभागाच्या अहवालानुसार धुळे जिल्ह्यातील धुळे, शिंदखेडा, शिरपूर तालुक्यातील पीक नुकसानीची माहिती निरंक आहे. मात्र, साक्री तालुक्यातील ८५ गावातील ४ हजार २९ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर २ हजार १८० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. यात सोयाबीन , भात, कापूस, मका , उडीद, भापा या पिकांचे नुकसान झाले आहे.
साक्री तालुक्यातील नुकसानग्रस्त क्षेत्राची माहिती याप्रमाणे - ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधित क्षेत्र ३५८.९० हेक्टर क्षेत्र इतके आहे . तर ३३ टक्क्यांपेक्षा कमी बाधित क्षेत्र १ हजार ७९४ हेक्टर क्षेत्र इतके आहे.
नुकसान झालेले पीक, क्षेत्र याप्रमाणे - सोयाबीन - १ हजार १२४.८० हेक्टर क्षेत्र . भाजीपाला - १०८.२० हेक्टर क्षेत्र.
कापूस - १६.४० हेक्टर क्षेत्र. भात - १३ हेक्टर क्षेत्र.
उडीद - २ हेक्टर क्षेत्र. अशा एकूण २ हजार १८० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले
आहे.
हेही वाचा - मंत्रिमंडळाला विस्ताराला वेळ लागत असल्याने शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता; अनेकांना मंत्रिपदाचे वेध!