ETV Bharat / state

धुळ्यात आमदार अनिल गोटेंनी केली लोकसभा लढवण्याची घोषणा

'मोदीजी आपसे हमारा कोई बैर नही, लेकीन भामरे अभी तेरी खैर नही'....मोदीजींच्या नावावर जी 'गारदी' निवडूण आलेत, त्यांना आता आम्ही गारद करणारच

धुळे
author img

By

Published : Mar 18, 2019, 5:42 AM IST

धुळे - सुभाष भामरे यांचा पराभव करण्यासाठी आपण लोकसभा निवडणूक लढविणार असून, भामरेंच्या रूपाने लागलेल्या कॅन्सरचे ऑपरेशन करण्यासाठी मला निवडणूक लढवायची आहे, अशी प्रतिक्रिया धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली. लोकसभा निवडणूक लढविण्याच्या चर्चेला अखेर आमदार अनिल गोटेंनी पूर्णविराम दिला आहे.

आमदार अनिल गोटे

धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून डॉ. सुभाष भामरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मात्र, दुसरीकडे आमदार अनिल गोटे देखील डॉ. भामरेंच्या विरोधात उभे राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. अखेर या चर्चेला आमदार अनिल गोटे यांनी पूर्णविराम दिला असून आपण लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. भामरेंच्या रूपाने लागलेल्या कॅन्सरचे ऑपरेशन करण्यासाठी आपण ही निवडणूक लढविणार असल्याचे ते म्हणाले.

धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपचे दोन्ही उमेदवार निष्क्रीय असून आपण केलेल्या कामाची जनतेला माहिती आहे. मनमाड इंदौर रेल्वेमार्गाच्या कामाचा डॉ. भामरेंनी पुरावा दाखवावा, आपण राजकारण सोडून देऊ, तसेच कोणत्याही पक्षाकडून आपण ही निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच या निवडणुकीत "मोदीजी आपसे हमारा कोई बैर नही, लेकीन भामरे अभी तेरी खैर नही" अशी नवीन घोषणा आपली असणार आहे, अशी प्रतिक्रिया अनिल गोटे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली. आमदार गोटेंच्या या निर्णयामुळे आता धुळे लोकसभा मतदारसंघात नवीन राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

ANCHOR:    धुळे :     सुभाष भामरे यांचा पराभव करण्यासाठी आपण लोकसभा निवडणूक लढविणार असून, भामरेंच्या रूपाने लागलेल्या कॅन्सरच ऑपरेशन करण्यासाठी मला निवडणूक लढवायची आहे अशी प्रतिक्रिया धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना व्यक्त केली. लोकसभा निवडणूक लढविण्याच्या चर्चेला अखेर आमदार अनिल गोटेंनी पूर्णविराम दिला आहे.

   VOICE:          धुळे लोकसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार म्हणून डॉ सुभाष भामरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. मात्र दुसरीकडे आमदार अनिल गोटे देखील डॉ भामरेंच्या विरोधात उभे राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. अखेर या चर्चेला आमदार अनिल गोटे यांनी पूर्णविराम दिला असून आपण लोकसभा निवडणूक लढविणार आहोत. डॉ भामरेंच्या रूपाने लागलेल्या कॅन्सरचं ऑपरेशन करण्यासाठी आपण हि निवडणूक लढविणार आहोत. धुळे लोकसभा मतदार संघात काँग्रेस आणि भाजपचे दोन्ही उमेदवार निष्क्रिय असून आपण केलेल्या कामाची जनतेला माहिती आहे. मनमाड इंदौर रेल्वेमार्गाच्या कामाचा डॉ भामरेंनी पुरावा दाखवावा आपण राजकारण सोडून देऊ तसेच कोणत्याही पक्षाकडून आपण हि निवडणूक लढविणार नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं तसेच या निवडणुकीत "मोदीजी आपसे हमारा कोई बैर नही, डॉ भामरे अभी 'तेरी खैर नही " अशी नवीन घोषणा आपली असणार आहे. अशी प्रतिक्रिया धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना व्यक्त केली. आमदार गोटेंच्या या निर्णयामुळे आता धुळे लोकसभा मतदार संघात नवीन राजकीय संघर्ष पेटणार हे नक्की.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.