धुळे- होम क्वारंटाईन शिक्का हातावर असलेले महिला व तरुण महाराष्ट्र-मध्य प्रदेश राज्य महामार्ग क्रमांक 6 वर सर्रासपणे फिरताना मोठ्या संख्येने दिसून आले आहेत. हे सर्वजण गुजरात राज्यातून महाराष्ट्रात आले आहेत. होम क्वारंटाईनचा शिक्का असूनही ते रस्त्यावर फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गुजरातमधील कंपनी बंद झाल्याने आम्ही टँकरने धुळे जिल्ह्यातील नेर कुसुंबा इथपर्यंत आल्याचे या महिला आणि तरुणांनी सांगितले आहे. सुरत येथून हे महिला आणि तरूण आले आहेत. गुजरातमधून आलेले काही जण वाशिम जिल्ह्यातील आणि मध्यप्रदेशातील आहेत.
हेही वाचा-कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नुकसान स्वीकारण्याची तयारी; शेतकऱ्यांची भावना
महिला व तरुणांच्या हातावर होम क्वारंटाईन शिक्के असताना देखील हे महिला आणि तरुण रस्त्यावर फिरत आहेत. यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांनी मागणी केली आहे.