ETV Bharat / state

धुळे: रोपवाटिका प्रकरण चिघळले, सतिश महाले यांना अटक - police

धुळे महापालिकेचे माजी नगरसेवक सतिश महाले यांनी आपल्या प्रभागातील महापालिकेच्या मोकळ्या जागेवर रोपवाटिका तयार केली होती. यावेळी रोपवाटिकेतील रोपे जप्त करायला आलेल्या महापालिकेला विरोध केल्यामुळे महाले यांना अटक करण्यात आली आहे.

सतिष महाले यांना अटक
author img

By

Published : Jul 10, 2019, 3:12 PM IST

धुळे- माजी नगरसेवक सतिश महाले यांनी आपल्या प्रभागातील महापालिकेच्या मोकळ्या जागेवर रोपवाटिका तयार केली होती. महापालिकेच्या जागेवर महाले यांनी कब्जा केला, असा आरोप करत महापालिकेने या रोपवाटिकेतील रोपे जप्त केली. यावेळी महाले यांना सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कारणावरुन पोलिसांनी अटक केली आहे.

सतिश महाले यांच्या पत्नी मनिषा महाले यांनी रोपवाटिकेला खासगी टाळे ठोकले होते. या पार्श्वभूमीवर आज सकाळी महापालिकेने रोपवाटिकेचे कुलूप पोलीस बंदोबस्तात तोडले. यावेळी सतिश महाले यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना याठिकाणी पाचारण करावे, त्याशिवाय कारवाई करू दिली जाणार नाही असा पवित्रा घेतला. शिवाय पोलीस अधिकाऱ्यांशी वाद घातला. यावेळी डीवायएसपी सचिन हिरे यांनी महाले यांना अटक करण्याचे आदेश दिले.

पोलीस बंदोबस्तामध्ये याठिकाणची रोपे जप्त करण्यात आली. याप्रकरणी आता काय कारवाई होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

Intro:धुळे महापालिकेचे माजी नगरसेवक सतिष महाले यांचे रोपवाटिका प्रकरण चिघळले आहे, याप्रकरणी सतिष महाले यांना आज अटक करण्यात आली.

Body:धुळे महापालिकेचे माजी नगरसेवक सतिष महाले यांनी आपल्या प्रभागातील महापालिकेच्या मोकळ्या जागेवर रोपवाटिका तयार केली होती. महापालिकेच्या जागेवर सतिष महाले यांनी कब्जा केल्याच्या आरोपातून या रोपवाटिकेतील रोपे महापालिकेने जप्त केली आहेत. या कारवाईत रोपांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. यामुळे संतप्त झालेल्या सतिष महाले यांच्या पत्नी मनिषा महाले यांनी मंगळवारी या रोपवटीकेला खाजगी ताळे ठोकून या रोपांचा हिशेब दयावा अशी मागणी केली होती. यापार्श्वभूमीवर आज सकाळी महापालिकेने रोपवाटिकेचे कुलूप पोलीस बंदोबस्तात तोडले. यावेळी सतिष महाले यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना याठिकाणी पाचारण करावे त्याशिवाय कारवाई करू दिली जाणार नाही असा पवित्रा घेतल्यावर डीवायएसपी सचिन हिरे यांनी सतिष महाले यांना अटक करण्याचे आदेश दिले. यावेळी पोलीस बंदोबस्तात याठिकाणची रोपे जप्त करण्यात आली. याप्रकरणी आता काय कारवाई होते याकडे सगळ्यांच लक्ष लागून आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.